रत्नागिरी, ता.14 : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि युवासेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खो-खो आणि होतकरु खेळाडूंना साह्य करण्यासाठी युवासेनेकडून दोन खेळाडूंना सायकल प्रदान करण्यात आल्या. शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छ. शिवाजी क्रीडांगणावर हा कार्यक्रम संपन्न झाला. Assist players on birthdays
या कार्यक्रमाला उद्योजक अण्णा सामंत, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, रत्नागिरीचे तालुका युवाअधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभि दुडये, मनोज साळवी, शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते. Assist players on birthdays
खेळाडूंना सहकार्य करण्याची संकल्पना युवा तालुकाधिकारी तुषार साळवी यांनी मांडली होती. त्यानुसार श्रेया सनगरे आणि साक्षी डाफळे या दोघींना सायकल भेट देण्यात आली. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गेले अनेक वर्षे खो-खो चा सराव सुरु असून यामध्ये आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. या मैदानावर सकाळ-संध्याकाळ नियमित सराव होत असून विविध शाळांमधील मुली-मुले येत असतात. सर्वसामान्य कुटूंबातील या मुलांना घडवण्याचे काम या मैदानावर केले जाते. त्यांना मदतीचा हात म्हणून युवासेना आणि शिवसेनेकडून मदतीचा हात दिला गेला. त्यांच्यासाठी राज्याचे माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे मेहनत घेत आहेत. उपस्थित मान्यवरांनी खो-खोच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. Assist players on birthdays