• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आशासेविका चार महिने मानधनाविना

by Mayuresh Patnakar
February 9, 2022
in Guhagar
16 0
0
Ashasevika four months without honorarium

Ashasevika four months without honorarium

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

14 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

गुहागर,(Guhagar) ता. 9 : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर दिवसभर राबणाऱ्या आणि शासनाने ठरवून दिलेली 75 प्रकारची कामे करूनही आशासेविकांवर (Ashasevika)आता उपासमारीचा वेळ आली आहे. आशासेविकांचे गेल्या चार महीन्यांचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे आशासेविका कमालीच्या संतापल्या आहेत. विविध मागणीसाठी 14 फेब्रुवारीला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector's Office)धडकणार आहेत. जनजागृतीसाठी मंगळवारी चिपळून पंचायत समितीच्या आवारात आशासेविकांची बैठक झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी मार्गदर्शन केले. Ashasevika four months without honorarium
कोविडच्या (Kovid) कामासाठी केंद्रसरकार कडून मिळणारे एक हजार रूपये ऑक्टोबर 2021 पासून बंद केले आहे. तो पूर्ववत करण्याचे आदेश केंद्रसरकारने दिले आहेत. त्यानूसार आशासेविकांना 1 हजार व गटप्रवर्तकांना 500 रूपये भत्ता मिळावा, गेल्या चार महीन्यांपासून रखडलेले मानधन देण्यात यावे. 17 जुलै 2020 शासनाने राज्य निधीतून आशासेविकांना 2 हजार व गटप्रवर्तकांना 3 हजार रूपये मोबदल्याची वाढ केली होती. मात्र हा मोबदला 2021 पासून देण्यात आलेला नाही. हा थकीत मोबदला नियमित देण्याची मागणीही आशासेविकांनी केली आहे. Ashasevika four months without honorarium
Ashasevika four months without honorarium
Ashasevika four months without honorarium
1 जुलै 2020 पासून वाढलेल्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारची कपात न करता द्यावा. राज्य कृती समिती व आरोग्य मंत्र्यांच्या संयूक्त बैठकीत जुलै 2021 आशासेविकांच्या मोबदल्यात 1000 हजार रूपये  व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 1200 रूपये दरमहा वाढ व कोरोनाचा प्रादुर्भाव असेपर्यंत 500 रूपये दरमहा प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले होते. त्याची अमलबजावणी करण्यात यावी. या विविध मागण्योच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector's Office) आशासेविका (Ashasevika) व गटप्रवर्तकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे राजाध्यक्ष अध्यक्ष शंकर पुजारी यांच्यासह तालूकाध्यक्षा प्रतीक्षा खेडेकर, वर्षा मोहिते, वृषाली साळवी, रश्मी पानवलकर, वर्षा सुर्वे, शिवानी कदम, स्नेहा मोरे यांच्यासह तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Health Center) आशासेविका उपस्थित होत्या. Ashasevika four months without honorarium

Tags: AshasevikaAshasevika four months without honorariumGuhagarGuhagar NewsKovidLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.