• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संतोष जैतापकरांची प्रचारात मुसोंडी

by Manoj Bavdhankar
February 4, 2026
in Politics
149 2
8
Asgoli Zilla Parishad group election is very tight
293
SHARES
838
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : असगोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. या गटातून  उभे असलेले  सेना भाजप युतीचे उमेदवार संतोष जैतापकर यांनी येथील प्रलंबित पाणी प्रश्न, रस्ते, शिक्षण, आरोग्य, युवक, महिला सक्षमीकरण कृती आराखडा तयार करून आपल्या प्रचारात आक्रमक पवित्रा घेतला आहे. Asgoli Zilla Parishad group election is very tight

संतोष जैतापकर यांनी कोरोना महामारीच्या काळात यांनी अक्षरशः घराबाहेर राहुन नागरिकांच्या सेवेसाठी स्वःतला झोकून दिले. हेच योगदान अनेक कुटुंबांसाठी जीवनदायी ठरले. या गुहागर साठी आरोग्य टीम तयार केली. या टीम द्वारे अनेक गरजू अडचणीत असलेल्या दवाखान्यात जाऊन मदत वैद्यकीय मदत करण्याचे काम आजही सुरू आहे.  यामुळे गावोगावी संतोष जैतापकर यांचे या उल्लेखनीय कामाची प्रशंसा होत आहे. तसेच या निवडणुकीत उभे असताना मच्छीमार समाजाचे असलेले प्रलंबित प्रश्न थेट युती सरकार द्वारे  सोडवण्याची आश्वासन देत आहेत. Asgoli Zilla Parishad group election is very tight

अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन गावाना रत्नागिरी विज कंपनीतून ग्रामपंचायतला कर मिळत होता. परंतु कंपनीने हा कर बंद केलेला आहे. हा कर कोणामुळे बंद झाला हे सगळ्यांना ज्ञात असून यामुळे या गावांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. तो कर कंपनीकडून परत या ग्रामपंचायतीला मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत आहेत. धोपावे गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम दिरंगाईने ते लवकरच पूर्णत्वास नेणार असल्याचे प्रयत्न करणार असल्याचे  या मतदारसंघातील काही गावातील जलजीवन योजनेचे कामांकडे प्रकर्षाने लक्ष देणार असल्याचे सांगत आहेत. या भागात युवकांसाठी रोजगार मिळावा यासाठी पालकमंत्र्यांकडून प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. महिलांचे सक्षमीकरण. बचत गटांचे बळकटीकरण, ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन देण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. Asgoli Zilla Parishad group election is very tight.

Tags: Asgoli Zilla Parishad group election is very tightGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.