गुहागर, ता. 11 : राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मान. उदयजी सामंत यांच्या शिफारशीनुसार गुहागरचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व व शिवसेनेच्या युवा सेना तालुकाप्रमुख पदाचे गेले 6 वर्ष समर्थपणे जबाबदारी पेलणारे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक, अमरदीप दीपक परसुरे यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेच्या जिल्हा समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने संपूर्ण गुहागर तालुक्यामधून विविध सामाजिक, राजकीय स्तरावरून अमरदीप परचुरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. Artist Honorarium Scheme

अमरदीप परचुरे यांनी कला विकास रंगभूमी गुहागर, गजानन नाट्य समाज यांच्या माध्यमातून उत्सवानं मध्ये सादर होणाऱ्या नाटकांमध्ये अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत आदी. क्षेत्रात चमकदार कामगिरी केली असून अमरदीप परचुरे हे सद्या श्री. देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर मध्ये काम करीत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेचे संचालक असून जिल्हा बुद्धिबळ असोशियन या संस्थेचे ते सदस्य आहेत. Artist Honorarium Scheme