गुहागर, ता. 26 : तालुक्यातील विविध गावांमध्ये आज आणि उद्या ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन होणार आहे. उद्या रात्री पासूनच गावागावांत आरती आणि भजन यांचे मंजूळ स्वर ऐकायला मिळणार आहेत. चार दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आज सकाळपासून सुरू झाला असल्याकारणाने गणेशभक्त नाराज दिसतं आहेत. पावसाने अधूनमधून थोडी उसंत घेतल्यावर भक्त उत्साहाने गणेश शाळांमधून मूर्ती घरोघरी आणत आहेत. प्रत्येक घरात गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. Arrival of Ganesha in Konkan

मुंबई मधील कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गावाला आले असल्याने सर्वच घरांमध्ये गणरायासाठी आकर्षक आरास केली गेली आहे. विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईंनी प्रत्येकाची घर उजळून निघाली आहेत. गणरायाला लागणारी सामग्री खरेदीसाठी बाजारात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. गणरायाच्या आगमनाने आबालवृद्धांमध्ये आनंद आहे. गणेश उत्सवासाठी परराज्यांतून आणि परजिल्ह्यातून मुंबई परिसरातून अनेक भाविक घरी आल्याने बंद असलेल्या घरांची टाळी आता गणेशोत्सवादरम्यान उघडी राहणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. Arrival of Ganesha in Konkan