• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

by Ganesh Dhanawade
June 14, 2022
in Guhagar
19 0
0
Arekar resigns as district president

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. साहिल आरेकर

36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.14 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. साहिल आरेकर यांनी नुकताच आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन कार्यकर्त्यांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी श्री. आरेकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. किरण शिखरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. Arekar resigns as district president

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेच्या माध्यमातून गेली 9 ते 10 वर्षे श्री. साहिल आरेकर कार्यरत आहेत. सन २०१२ ते २०१४ त्यांनी गोगटे महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉलेज कमिटी अध्यक्ष, त्यांनतर २०१६ ला राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, २०१८ पासून पाच वर्षे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर ते काम करत आहेत. गुहागरमध्ये आमदार श्री. भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशावेळी श्री. विक्रांत जाधव यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून श्री. साहिल आरेकर यांची ओळख असताना त्यांनी शिवसेना प्रवेश न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच रहाण्याचा निर्णय घेतला. Arekar resigns as district president

अनेक वर्षे पक्षाच्या विद्यार्थी सेलचे प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आता नवीन कार्यकर्त्यांना त्या सेलमध्ये आणि पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी श्री. आरेकर यांनी त्यांचा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. किरण शिखरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. तसेच आपण नवीन कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी वरिष्ठांना केली आहे. Arekar resigns as district president

Tags: Arekar resigns as district presidentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNationalist CongressNCPNews in GuhagarShiv Senaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युजशिवसेना
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.