• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जागतिक औषध केंद्रला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

by Guhagar News
March 11, 2022
in Ratnagiri
16 0
0
Approval of World Drug Center
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि.11 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात यजमान देश  करारावर स्वाक्षरी करून गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक औषध केंद्र (WHO GCTM) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. Approval of World Drug Center

(WHO GCTM) ची स्थापना आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जामनगरमध्ये केली जाईल. जगभरातील पारंपारिक औषधांसाठी हे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र (कार्यालय) असेल. Approval of World Drug Center

फायदे :

  1.  जगभरात आयुष पद्धती स्थापित  करणे .
  2.  पारंपरिक औषधांशी संबंधित जागतिक आरोग्य विषयांवर नेतृत्व प्रदान करता येईल.
  3. गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता, प्रवेश आणि पारंपारिक औषधांचा तर्कसंगत वापर सुनिश्चित करण्यासाठी.

4.  डेटा उपक्रम विश्लेषणे गोळा करण्यासाठी आणि परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित तांत्रिक क्षेत्रांमध्ये, साधने आणि पद्धतींमध्ये मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे. विद्यमान टेलिमेडिसिन डेटा बँक, आभासी ग्रंथालये आणि शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचे सहयोगी तयार करणारे (WHO TM) माहिती विज्ञान केंद्राची परिकल्पना करणे.

उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या क्षेत्रात विशिष्ट क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे आणि कॅम्पस, निवासी किंवा वेब-आधारित आणि जागतिक आरोग्य संघटना अकादमी आणि इतर धोरणात्मक हितधारकांसह भागीदारीद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदनोम घेबेरेयस यांनी भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत 13 नोव्हेंबर 2020 रोजी 5 व्या आयुर्वेद दिनानिमित्त भारतात  (WHO GCTM) ची स्थापना करण्याची घोषणा केली. माननीय पंतप्रधानांनी (WHO) च्या या उपक्रमाची प्रशंसा केली. आणि नमूद केले की (WHO GCTM) जागतिक आरोग्य केंद्र म्हणून उदयास येईल. पुराव्यावर आधारित संशोधन, प्रशिक्षण आणि पारंपरिक औषधांबद्दल जागरूकता वाढवेल. Approval of World Drug Center

समन्वय, अंमलबजावणी आणि उपक्रमांवर देखरेख ठेवण्याकरिता या केंद्राच्या स्थापनेसाठी एक संयुक्त कृती दलाची (JTF) निर्मिती करण्यात आली आहे. संयुक्त कृती दलामध्ये भारत सरकार, भारताचे स्थायी मिशन, जिनिव्हा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. निवडक तांत्रिक उपक्रम आणि पूर्णपणे कार्यरत (WHO GCTM) च्या नियोजनासाठी या अंतर्गत, (ITRA), जामनगर, गुजरात येथे एक हंगामी कार्यालय स्थापन केले जात आहे. Approval of World Drug Center

आयुर्वेद आणि युनानी प्रणालीचे प्रशिक्षण आणि सराव यावर प्रमाणित दस्तऐवज विकसित करणे, रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण-11 च्या पारंपरिक औषध प्रकरणातील दुसरे मॉड्यूल सादर करणे, एम-योगासारखे अॅप विकसित करणे, इंटरनॅशनल फार्माकोपिया ऑफ हर्बल मेडिसिन (आयपीएचएम) आणि इतर संशोधन अभ्यास इ. च्या कार्यास समर्थन देणे यासह अनेक आघाड्यांवर आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत सहकार्य केले आहे. Approval of World Drug Center जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आगामी (WHO-GCTM) आणि इतर विविध उपक्रम जगभरात पारंपरिक औषध क्षेत्रात भारताला अग्रस्थानी राखण्यासाठी  मदत करतील. Approval of World Drug Center

Tags: Approval of World Drug CenterGuhagarGuhagar NewsITRAJTFLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWHOWHO TMWHO-GCTMटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.