दिवाळीचा आनंद 21 गावातील 363 कुटुंबांत वाटला
गुहागर, ता. 23 : अनुलोम संस्थेच्या मित्रांद्वारे दिवाळीचा आनंद समाजात वाटुया उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे गुहागर विधानसभा क्षेत्रातील 21 गावातील 363 कुटुंबांना फराळ आणि 124 मुलांना फटाके भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमासाठी 95 दानशुर व्यक्तींनी मदत केली. तर फराळ आणि फटाक्याचे वितरण 21 अनुलोम मित्रांनी केले. Anulom’s initiative is successful
अनुलोम गुहागरने या उपक्रमाची तयारी नवरात्र उत्सवापासून सुरु केली. गावागावात असलेल्या अनुलोम मित्रांनी गावप्रमुख, वाडीप्रमुख, सरपंच, प्रभावशाली व्यक्ती यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून मोफत धान्य मिळत असल्याने रोजच्या भाकरीची चिंता नसते परंतू सणवाराला गोडधोड करण्याइतकी परिस्थिती नाही. तसेच दररोज परिस्थितीशी सामना करताना होणाऱ्या ओढाताणीमुळे सण उत्सव साजरे करण्याची इच्छाच नाही. अशा कुटुंबांचा अनुलोम मित्रांनी शोध घेतला. या कुटुंबाना फराळ आणि या कुटुंबातील मुलांना फटाके देता यावेत यासाठी समाजालाकडे मदतीचा हात मागतिला. या सर्व व्यवहारात पारदर्शकता रहावी, मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पैशाचा हिशोब मिळावा म्हणून एक व्हॉटसॲप ग्रुप बनवून त्यामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती टाकण्याची व्यवस्था करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे आवाहन करण्यात आले. यातून मदतीचा ओघ सुरु झाला. दसऱ्याला अनुलोम मित्रांकडून कुटुंबांची संख्या आल्यावर विविध ठिकाणाहून फराळाचे दर मागविण्यात आले. योग्य दर देणाऱ्यांकडे फराळाची ऑर्डर देण्यात आली. 17 ऑक्टोबरला फराळाचे सर्व साहित्य आणि फटाके आल्यानंतर अनुलोम मित्रांकडे हा फराळ पोचविण्याचे नियोजन झाले. Anulom’s initiative is successful

दिवाळाची आनंद समाजात वाटूया
धनत्रयोदशीचे दिवशी नरवण मधून या उपक्रमाला सुरवात झाली. पुढील दोन दिवसात अडूर, कोतळूक, असगणी, ओमळी, शीर, जानवळे, पिंपर, असगोली, कापसाळ, आंबडस, पोसरे, वावे तर्फे खेड, कुरवळ जावळी, कौंढर काळसुर, मढाळ, होडखाड, धामणंद, सवणस मुळगांव या गावात फराळ वाटप करण्यात आले. अनुलोम मित्र विपूल नार्वेकर, दिनेश खेडेकर, दिनेश देवाळे, समीर ओक, मिलिंद टक्के, संदिप जानवळकर, प्रकाश मोरे, चंद्रकांत दहीवलकर, रविंद्र कारकर, चंद्रकांत हेदवकर, संतोष धनावडे, सचिन कांबळी, मनोहर दिवाळे, सौ. अरुणा रेडिज, स्मिता पाडावे, संतोष घुमे, मंगेश मोरे, अशोक धाडवे, राजेंद्र उतेकर, काशिनाथ उतेकर, ज्ञानेश्र्वर शिंदे, प्रकाश पवार, गणेश आदवडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. Anulom’s initiative is successful

फराळ आणि फटाक्यांचे वितरण करताना गावातील प्रभावशाली व्यक्तींनाही सोबत घेण्यात आले होते. धामणंदमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, मढाळमध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुर्यकांत सोलकर, ग्रामपंचायत सदस्य प्राची सोलकर, गाव अध्यक्ष रविंद कारेकर, देवघरच्या सप्तेश्वर देवस्थानचे विश्र्वस्त शंकर चव्हाण, पिंपर येथे सरपंच अनिल घाणेकर, ग्रामस्था सुरेश मोरे, असगोली येथे एकतावर्धक मंडळाचे सल्लागार केशव घुमे, मुंबई मंडळाचे उपसरचिटणीस सुभाष तुकाराम घुमे, पत्रकार संतोष घुमे, नरवण येथे सरपंच संतोष मोरे, सवणस मुळगांव येथे पोलीस पाटील आणि ग्रामसंघाचे सचिव, अडूरमध्ये गुहागर तालुका पाटीदार समाजाचे हिरालाल पटेल, विठ्ठलाई मंडळाचे अध्यक्ष गोपाळ झगडे, सुनील कोपरकर व पड्याळवाडीतील ज्येष्ठ सदानंद दवंडे असे मान्यवर उपस्थित होते. Anulom’s initiative is successful

सज्जनशक्तीने दिला हात
369 कुटुंबाना 250 ग्रॅम चिवडा, चकली, शंकरपाळे तसेच लाडू व करंजी असा फराळ आणि लहान मुलांना 2 फुलबाजाचे बॉक्स, पाऊस बॉक्स देण्यासाठी एकूण 1 लाख 31 हजार रुपये इतका खर्च येणार होता. हा खर्च उभा करण्यासाठी अनुलोमचे भाग जनसेवक मयुरेश पाटणकर यांनी समाजाला विनंती केली. त्यासाठी समाजमाध्यमाद्वारे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई, पुणे, कोल्हापूर, बारामती, गुहागर आदी विविध ठिकाणाहून 95 कुटुंबानी मदत केली. यामध्ये मयुरेश पाटणकर (रु.1000), माधुरी कुलकर्णी 1000, संतोष केशव सोमण 1025, श्रीकांत महाजन 500, शशिकांत महाजन 500, चंद्रशेखर आपटे 1000, सुशांत दीक्षित 500, सुमेधा दीक्षित 500, डॉ. मंदार आठवले 500, अनिता अनंत तावडे 500, राजन वसंत पाटणकर 1000, दिपक सदानंद मुके 500, उमेश पंढरीनाथ पाटणकर 500, अनिल महाजन 501, गणेश संसारे 500, मनोज अरविंद बावधनकर 1000, विवेकानंद शंकर जोशी 500, सुबोध गुंडू सातार्डेकर 501, सुबोध महाजन 501. शिवाजी नाना आडेकर 1000, महेश मनोहर ओक 501, मधुलिका गोडबोले 501, डॉ. वसंत ओक 500, अमोल पोवळे 1100, योगेश यशवंत भोगले 700, दत्तात्रय यशवंत आरेकर 501, अनंत सदाशिव पाटणकर 1000, मयुरेश किसन साखरकर 500, मकरंद गंगाधर पटवर्धन 1000, सचिन विश्वनाथ सुर्वे तवसाळ 500, मोहित गोखले 500, मंगेश दाते 1000, संजय शंकर देशपांडे 1501, गुहागर तालुका पाटीदार समाज 12,500, जयश्री मनोहर शिरसावकर 500, ओवी योगेश वाघधरे 500, नीलेश वामन रानडे 500, दत्तात्रय नार्वेकर गुरुजी अडूर 500, रिआन सर्वेश भावे गुहागर 1000, सिद्धेश सुधाकर घाणेकर पुणे 500, राजेंद्र नारायण मालप 551, पद्माकर गोविंद थोरात 500, गजानन गंगाधर खरे 500, चंद्रकांत यशवंत हळये 555, ओंकार पाटील खालचापाट 1000, सारिका मनोहर घुमे 1000, नितीन मुळे पुणे 500, सुहास गुंडू सातार्डेकर 500, सुनीता दिलीप गोखले 500, दिपेश भागुराम आग्रे 1001, कैलास गोखले 1000, स्वाती दत्तात्रय चिवेलकर अडूर् 500, जनार्दन आंबेकर उमराठ 1000, दिनेश काशिनाथ जाक्कर 500, निलेश रवींद्र वराडकर 501, गायत्री विकास निमकर 1000, सुनीला गोंधळेकर 1000, शुभांगी बिवलकर 1000, शुभांगी जयंत पुरोहित 5000, राजेश्वरी अजरी 500, सुनील दत्ताराम रामाणे 500, संतोष जोगळेकर 1500, रिंदा बंकापुरे 1000, प्राजक्ता जोशी 1000, निलांबरी नामदेव बलंग 500, नमिता प्रसन्ना वैद्य 500, संदेश पटवर्धन 1000, निलेश गोळे 500, अनुराधा प्रशांत ताक्ते 500, अश्विनी पुरोहित- करंदीकर 500, विकास मेहेंदळे 500, मुकुंद भुतडा 500, ज्योत्स्ना शामसुंदर सोनी 500, गिरीराज सत्यवान घाडे 1000, स्वप्नील चव्हाण 1000, किरण पांडे 1000, रजनीकांत साळुंखे 1000, देवयानी कुलकर्णी 500, विराज राहुल मिरगे 1000, समीर काळे 25000, पंकजा साठे 5000, आशिष शेंबेकर सावर्डे 2800, प्रशांत शिरगावकर पालशेत 2000, महेश नाटेकर 500, जयश्री सिकनी बारामती 1100, मेघना मुल्हेरकर पुणे 1000, अभिजित लिंगायत 500, शांताराम भार्गव लघाटे 500, सुरभी अनंत पाटणकर 5000, कृष्णा पिंपळे गुहागर 1001, अभिजित मुकुंद जोशी 2002, भालचंद्र अनंत बोडस संगमेश्वर 501, स्नेहा रत्नदिप जाधव 1001 आदींनी आर्थिक मदत केली. Anulom’s initiative is successful

विशेष मदत
या उपक्रमाला 4 मुलांनी विशेष मदत केली. गुहागरमधील व्यापारी संतोष जोगळेकर आणि शारजामध्ये नोकरीनिमित्त रहाणारे अभिजीत जोशी यांच्या मुलांनी आपल्या पिगी बँकमधील साठवलेले रुपये या कामासाठी स्वत:हून दिले. गुहागर तालुका पाटीदार समाजाने 12 हजार 500 रुपयांची तर ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक काळे यांनी 25 हजार रुपयांची मदत केली. तसेच सावर्डे येथील शेंबेकर बंधुंनी आर्थिक मदतीबरोबरच अत्यंत स्वस्त दरात त्यांचा प्रसिध्द चिवडा उपलब्ध करुन दिला. Anulom’s initiative is successful
या उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनुलोमने आगळा वेगळा समाजाला आनंद देणारा कार्यक्रम केला. खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. दिवाळीचा आनंद समाजात वाटता आला. अशा प्रतिक्रिया अनुलोम मित्रांनी दिल्या. तर योग्य उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्याची संधी यानिमित्ताने आम्हाला मिळाली. अशी प्रतिक्रिया आर्थिक साह्य करणाऱ्यांनी व्यक्त केली. Anulom’s initiative is successful
