गटविकास अधिकारी भिलारे, अधिकारी परिचय सभेत केले आवाहन
गुहागर, ता. 21 : ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठीच दोन वेळा एमपीएससी दिली. मात्र एकटा अधिकारी बदल घडवू शकत नाही. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. टीम म्हणून अनुलोम मित्रांनी शासनाला, अधिकाऱ्यांना सहकार्य केले तर निश्चितच विकासाचा वेग वाढेल. असे प्रतिपादन गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले. ते अनुलोम अधिकारी परिचय सभेत बोलत होते. Anulom friends should cooperate with the government

सोमवारी (ता. 21) व्याडेश्र्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात अनुलोम – अधिकारी परिचय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनुलोमचे विभाग प्रमुख रवींद्र भुवड, उपविभाग प्रमुख रमेश ढेबे यांच्यासह गुहागर तालुक्यातील 25 अनुलोम मित्र उपस्थित होते. सुरवातीला तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यापुढे कोणत्याही योजनेचे लाभ घ्यायचा असेल तर सातबाऱ्यावरील प्रत्येक व्यक्तीला फार्मर आयडी निर्माण करणे आवश्यक आहे. आज अपेक्षित कामाच्या निम्मेच काम झाले आहे. तालुक्यात विविध गावाचे निवासी मात्र जे नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी रहातात त्यांच्यापर्यंत ही बाब पोचविण्याचे काम अनुलोम मित्रांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, आरोग्य विभाग सेवा, सर्वेक्षण आणि योजनांचे लाभार्थी असे त्रिस्तरीय काम करतो. आमच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डाचे डिजीटलायझेशन होणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुलोम मित्रांनी जनजागृती करावी. Anulom friends should cooperate with the government

परिचय सभेचा समारोप करताना गटविकास अधिकारी भिलारे म्हणाले की, कोकणातील गावांचे क्षेत्र मोठे, वाड्यांची संख्या 7 ते 8 पेक्षाही अधिक आणि त्यातील अर्धी लोकसंख्या गावाबाहेर असते. त्यामुळे फार्मरर्स आयडीचे उद्दीष्ट असो वा घरकुल देण्याचे शासनाचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. गावकऱ्यांना ओळखणारे अनुलोम संस्थेचे मित्र गावात शासनाच्या मदतीला आले तर विकासाचा वेग आपण वाढवू शकतो. Anulom friends should cooperate with the government

अनुलोमचे कोकण विभाग प्रमुख रवींद्र भुवड यांनी संजय गांधी निराधार योजनेपासून ते बांधकाम कामगार योजनेपर्यंत अनेक योजनांचा लाभ अनुलोमने सर्वसामान्य जनतेला मिळवून दिल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुलोम मित्र विलास नरळकर यांनी केले. तर उपविभाग प्रमुख रमेश ढेबे यांनी सर्वांचे आभार मानले. Anulom friends should cooperate with the government

यावेळी गुरुनाथ कारेकर तळवली, रामचंद्र म्हसकर त्रिशुळ साखरी, विशेष घडवले आरे, सौ. अमृता जोशी, विनायक लांजेकर मुंढर, मंदार कदम देवघर, चंद्रकांत हेदवकर कौंढर काळसुर, सौ. स्मिता पाडावे गुहागर, समीर काळे पालशेत, राकेश विचारे पोमेंडी, समीर ओक कोतळूक, जगन्नाथ भोसले सुरळ, सुरेश शिर्के मढाळ, रविंद्र कारकर मढाळ, मंगेश गुजर पाली, दिनेश खेडेकर अडुर, मिलिंद टक्के शीर, संतोष धनावडे उमराठ, नितीन रावणंग कुडली माटलवाडी आदी ठिकाणचे अनुलोम मित्र उपस्थित होते. Anulom friends should cooperate with the government
