गुरुपौर्णिमेनिमित्त शाळांमध्ये नियोजन, विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहीत
गुहागर, ता. 11 : अनुगामी लोकराज्य महाभियान या संस्थेच्या अनुलोम मित्रांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांचा गौरव केला. या उपक्रमाचे नियोजन करताना आपल्या गुरुंचा सत्कार करण्याची संधी अनुलोम मित्रांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. काही शाळांमध्ये गुरु सन्मान कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. Anulom friends glorified teachers


आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांच्या जयंती भारतात गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने अनुलोम संस्थेतर्फे महाराष्ट्रात गुरूगौरव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर विधानसभा क्षेत्रातील 19 अनुलोम मित्रांच्या सहभागातून 15 गावातील 1 आयटीआय, 13 माध्यमिक शाळा आणि 2 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकाच दिवशी 16 गुरू गौरव कार्यक्रम. संपन्न झाले. यामध्ये पाथर्डी (जि.प शाळा व अंगणवाडी), कोतळूक, देवघर, जामसूत, चोरवणे, मुंढर, गुहागर, वेलदूर, वीर (माध्यमिक विद्यालय व जि.प. शाळा), लवेल, रानवी, पोमेंडी (जि.प शाळा व अंगणवाडी), देवघर, दहीवली, पालपेणे आणि मार्गताम्हाने या गावांचा समावेश होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनुलोम मित्र मिलिंद तांबे, पाथर्डी, जगन्नाथ भोसले सुरळ, समिर ओक कोतळूक, ज्ञानेश्र्वर शिंदे धामणंद, संदिप शिर्के सर मुंढर, विनायक लांजेकर मुंढर, मंदार कदम देवघर, प्रकाश मोरे पिंपर, सौ. स्मिता पाडावे गुहागर, सौ. अमृता जोशी गुहागर, संतोष भालेकर वेलदूर, सौ. श्रेया विरकर वीर, अजित गद्रे लवेल, संदिप पालकर दाभिळ, मंदार पालशेतकर गुहागर (रानवी आयटीआय), राकेश विचारे पोमेंडी, रविंद्र लाड खरवते, विलास नरळकर पालपेणे, दत्ता नरवणकर पालपेणे, प्रशांत गोंधळेकर मार्गताम्हाने यांनी मेहनत घेतली होती. Anulom friends glorified teachers


देवघर शाळेतील गुरु गौरव कार्यक्रमाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांची पाद्यपूजा केली. तसेच औक्षणही केले. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरणाचा संदेश दिला. मुंढरमधील सिध्दीविनायक विद्यामंदिरमध्ये 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींनी देखील शिक्षकांचे औक्षण केले. मार्गताम्हानेमधील वसंतराव भागवत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णीमेनिमित्त एक नाटुकले सादर केले. सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात गुरुचे महत्त्व याविषयावर भाषण केले. या कार्यक्रमाचे शाळांनी देखील कौतुक केले. या उपक्रमाच्या निमित्ताने अनुलोमने आमचा सत्कार केलाच त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्येही कार्यक्रम कसा घ्यावा याचे बिजारोपण केले. विद्यार्थ्यांना आत्मविश्र्वास दिला. दरवर्षी या कार्यक्रमाचे नियोजन आम्ही करतो. यावर्षी शिक्षकांचा गौरव खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी केला. अशी प्रतिक्रिया मुंढर विद्यालयातील शिर्केसर यांनी व्यक्त केली. Anulom friends glorified teachers



















