• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल पब्लिक स्कूल शृंगारतळीचा ऍन्युअल डे साजरा

by Ganesh Dhanawade
February 16, 2026
in Guhagar
16 0
0
Annual Day at Regal Public School Shringartali
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : रिगल पब्लिक स्कूल, शृंगारतळीचा ऍन्युअल डे नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.महेश कोळवणकर(सचिव, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी), मा.सौ. अश्विनी सरवणकर(मुख्याध्यापिका, स्टार किड्स प्री स्कूल, शृंगारतळी), मा. सौ.नीलिमा क्षीरसागर(शिक्षिका, स्टार किड्स प्री स्कूल) तसेच पालक प्रतिनिधी श्री.सुदेश हडकर व सौ.श्वेता भोसले उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. Annual Day at Regal Public School Shringartali

आपल्या प्रास्ताविकेमधे रिगल पब्लिक स्कूलच्या समन्वयक सौ.सुखदा पोतदार यांनी रिगल पब्लिक स्कूलमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. यानंतर रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच रिगल पब्लिक स्कूल येथे चालू शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या विविध उपक्रमांमध्ये पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल्स व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. Annual Day at Regal Public School Shringartali

Annual Day at Regal Public School Shringartali

श्री.महेश कोळवणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये CBSE बोर्डचे रिगल पब्लिक स्कूल शृंगारतळी येथे सुरू केल्याबद्दल मा. श्री. संजयराव शिर्के यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षकवर्ग हे अतिशय तळमळीने काम करत असल्याचे सांगून सर्वांचे कौतुक केले. श्री. सुदेश हडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये रिगल पब्लिक स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले तसेच यातून मुलांची उत्तमोत्तम प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांना सांभाळणे हे अतिशय कठीण असून रिगल पब्लिक स्कूलचे शिक्षक ती जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडत असल्याचे ते म्हणाले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.मोरे यांनी CBSE बोर्ड ही काळाची गरज ओळखून रिगल पब्लिक स्कूल हे अतिशय माफक फी मध्ये शृंगारतळी येथे सुरू झाल्याचे सांगितले. Annual Day at Regal Public School Shringartali

यानंतर विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली. यामध्ये कोळी डान्स, महाभारत, रॅम्प वॉक व ग्रुप डान्सचा समावेश होता. सोलो डान्समध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कु. आर्या अविनाश सावंत, कु. संस्कृती सुमित शिरगावकर व कु.सायरा मंगेश मिरगल यांनी मिळवला. यावेळी रिगल पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. Annual Day at Regal Public School Shringartali

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ऋचा दळी यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रा.सुखदा पोतदार, प्रा. एकता जाधव, प्रा.ऋचा दळी, सौ.संचिता लांजेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉ सुमिता शिर्के, संचालक श्री. अनिश शिर्के, रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे, रिगल पब्लिक स्कूलच्या समन्वयक सौ.सुखदा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. Annual Day at Regal Public School Shringartali

Tags: Annual Day at Regal Public School ShringartaliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.