गुहागर, ता. 29 : पर्यटकांसह कोकणवासीयांचे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या कोकणातील गुहागरचे सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पारितोषके देवून गौरव करण्यात आला. या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खातू मसालेचे मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी यशस्वी उद्योजक श्री. गिरीश काशीनाथ कोळवणकर व कॅडबरी कंपनीतील निवृत अधिकारी श्री. सुरेश अनंत देवळेकर, श्री. विजय जुवळी उपस्थित होते. Anniversary of the Khatu Spices Industry
गुहागर सारख्या छोट्या गावामध्ये 1976 साली शुन्यातून विश्व उभारत यशाची सर्वात उंच शिखरे गाठून खातू मसालेचे सर्वेसर्वा उद्योगभूषण डॉ. शाळिग्राम खातू यानी खातू मसाले हा एकमेव ब्रँड निर्माण केला. खातू मसालेची उत्पादने मुंबई बरोबरच आता सातासमुद्रापार म्हणजेच इंग्लंड, दुबई सारख्या आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत विक्रीसाठी पोहोचली आहेत. शिवाय देशातील विविध मॉल, डी मार्ट, अपना बाजार, बिगबाजार व ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या अमेझॉनवरही उत्पादने उपलब्ध आहेत. खातू मसाले हे फक्त आपल्या मालाचा जास्तीत जास्त विक्री कशी होईल हा एवढाच विचार न करता आपला माल ग्राहकापर्यंत चांगल्याप्रकारे पोहोचतो की नाही किंवा कोणती अडचण येत नाही ना, याचा विचार केला जातो. जास्तीत जास्त ग्राहक खुश कशा प्रकारे होतील यासाठी नवीन उपक्रम केले जातात. Anniversary of the Khatu Spices Industry
मे खातू मसाले उद्योग समूहाच्या यशात आर्थिक सल्लागार बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक श्री. भास्करराव दत्ते, मुले शैलेंद्र आणि सूरज तसेच पूर्ण कुटुंबाची लाभलेली साथ आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले प्रामाणिक काम यामुळेच आज खातू मसाले यशाच्या शिखरावर आहे. खातू मसाले हा उद्योग केवळ व्यवसाय नसून एक कुटुंबच आहे. कामगारांच्या अथक मेहनतीमुळे खातू मसाले उद्योगचे नाव सातासमुद्रापार पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. Anniversary of the Khatu Spices Industry
यानिमित्त यावर्षी खातू मसालेचे उत्कृष्ट सेल्समन म्हणून प्रथम श्री.अमित शंकर गोताड, द्वितीय श्री. गणेश सुरेश रहाटे, तृतीय श्री संदीप शंकर रहाटे म्हणून गौरवण्यात आले. तसेच हॉटेल अन्नपूर्णा मधील सेवानिष्ठ कर्मचारी दणदणे बुवा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. Anniversary of the Khatu Spices Industry
