गुहागरात दि. १४ एप्रिल पासून महोत्सव व ११५ वा वर्धापन दिन सोहळा
गुहागर, ता. 12 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण यांचा महोत्सव व ११५ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि. १४ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. तरी सर्वांनी श्रींच्या दर्शनाला व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Anniversary of Shri Naranarayana Devasthan

त्या सोहळ्या निमित्ताने गुरुवार दि. १४ रोजी सकाळी ५.३० वा. काकड आरती स. ८ वा. श्रींची षोडशोपचार पूजा, दुपारी १२.३० वा. ग्रंथ पारायण, आरती व महाप्रसाद सायं. ५.३० वा. श्री पिंपळादेवी महिला मंडळाचे भजन सायं. ७ वा. गुरुदेवता कलावती आईचे भजन, रात्री १० वा. सुश्राव्य संगीत भजने. Anniversary of Shri Naranarayana Devasthan

तसेच शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सायं. ४ वा. श्री नर नारायण पालखी सोहळा, शनिवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्म सोहळा सायं. ४ वा. श्री हनुमान पालखी सोहळा रविवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. Anniversary of Shri Naranarayana Devasthan
तरी सर्वांनी श्रींच्या दर्शनाला व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Anniversary of Shri Naranarayana Devasthan
