माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो ; संस्कृती जाधव
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आनंदवन बुध्दविहार मौजे आबलोली ,( Anandvan Buddha Vihar Abloli ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे विश्वरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा. व भगवान गौतम बुध्द या महामानवांचा २५६६ वा संयुक्त जयंती महोत्सव व वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. मुंबई संघटनेचे अध्यक्ष सुरेश सोन्या पवार यांचे अध्यक्षतेखाली गाव व मुंबई संघटनांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला. Anniversary of Buddha Vihar Abaloli

या कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना काळात जे सभासद मृत झाले त्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर बुध्द विहाराचे जेष्ठ सभासद सिताराम रामा कदम, धर्मा कदम यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर , तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमाचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. Anniversary of Buddha Vihar Abaloli
यावेळी संस्कृती जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कथा उपस्थितांना सांगितल्या. संस्कृती जाधव म्हणाल्या की, महाड मधील चवदार तळ्याचे पाणी गुरे- ढोरे, कुत्री पित होती. पण तेच पाणी अस्पृश्याना पीण्याचा अधिकार नव्हता. ३० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह ओंजळीने पाणी पीऊन केला .आणि तमाम अस्पृश्य मानव जातीला पाणी पीण्याचा हक्क आणि अधिकार मिळवून दिला. तसेच भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले असून महिलांना हक्क अधिकार, आणि आरक्षण संविधानाव्दारे दिले. त्यामूळेच आमच्या जिवनाचे सोने झाले. Anniversary of Buddha Vihar Abaloli

यानंतर साक्षी राजेंद्र कदम याही लहान मुलीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले यांच्या जिवनावर ” माई सावित्री तू महान देशाचा अभिमान शिकली, तू शाळा फूलविला क्रांतीचा मळा ” हे गाणे सादर केले. नंतर मिलींद कदम, शिद्धार्थ पवार, मंगेश कदम, नागपूर हून आलेल्या अलका प्रेम कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जिवन कार्यावर मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर सुरेश सोन्या पवार यांच्या अध्यक्षीय भाषणा नंतर शेवटच्या सरणायतेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Anniversary of Buddha Vihar Abaloli
यावेळी गाव संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम कदम, अॕड. एम. बी. पवार, प्रमोद पवार, मुंबई संघटनेचे सेक्रेटरी अनिल कदम, गाव संघटनेचे सेक्रेटरी अविनाश कदम, सैनिक सचिन कदम, माजी सैनिक अनंत पवार, बापू पवार, सुरेश रामा पवार, अशोक कदम, सेवानिवृत्त बीएमसीचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक प्रेम नारायण कांबळे, शिक्षिका अलका प्रेम कांबळे आदी उपस्थीत होते. Anniversary of Buddha Vihar Abaloli
