रत्नागिरी, ता.03 : रत्नागिरी गाडीतळ येथील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सुरू असलेले चांगले काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. ४१ वर्षे यशस्वीपणे शाळा चालवण्याबद्दल संस्था, शाळा, शिक्षक, पालकांचे अभिनंदन. संख्याशास्त्रानुसार हजारपैकी दोन मुले मुकबधिर जन्मतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशात नवजात बालकांचे स्क्रिनिंग केल्यानंतर अपंगत्व समजल्यानंतर त्वरित उपचार करता येतात. भारतातही असे स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. मूकबधिर विद्यालयासारख्या विद्यार्थ्यांना उभे करणाऱ्या शाळेला राजाश्रयाबरोबर लोकाश्रयाची नक्कीच मिळत आहे, असे प्रतिपादन येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर यांनी केले. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. Anniversary celebration

कार्यक्रमात व्यासपीठावर दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे, शाळा व्यवस्थापिका पद्मश्री आठल्ये, विभागप्रमुख प्रसाद वाघधरे, मुख्याध्यापक गजानन रजपूत व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी डॉ. बेडेकर यांनी शाळेकरिता दहा हजार रुपयांची देणगी दिली. Anniversary celebration

मूकबधिर विद्यार्थ्यांची शारिरिक क्षमता, अंगचे कलागुण शोधून काढून त्यांचा विकास कसा होईल, याकरिता कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील शिक्षक प्रयत्न करतात. आज शाळेचे अनेक विद्यार्थी, दहावी, बारावी आणि पदवीमध्येही यशस्वी झाले आहेत. आपापले व्यवसाय सुरू करून त्यांचे वैवाहिक पुनर्वसनही होत आहे. ही गोष्ट कौतुकास्पद व रत्नागिरीकरांना अभिमानास्पद असल्याचे डॉ. संतोष बेडेकर यांनी सांगितले. Anniversary celebration

कार्याध्यक्ष सुमिता भावे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती सांगितली. सासरे माजी आमदार भावे यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन व घरी जाऊनही शिक्षकांनी शिकवले आहे. या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी संस्था प्रयत्न करत असून अधिक सुविधा देण्यावर भर असल्याचे नमूद केले. Anniversary celebration

कार्यक्रमात राजीव गोगटे, पद्मश्री आठल्ये यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच शिक्षक आणि पालकांचेही अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश घवाळी, सीमा मुळ्ये यांनी केले. सौ. उपासना गोसावी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, माजी शिक्षिका, कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Anniversary celebration

विद्यार्थ्यांचा सन्मान
विविध देणगीदारांच्या मदतीतून विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेसाठी भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मूकबधिर विद्यालयाचे इयत्ता दहावीतील यशस्वी विद्यार्थी दिया औंधकर, सेजल अंबुलकर, श्रेया माने, रिजान मिरकर आणि तनिष जाधव, इयत्ता बारावीतील गुणवंत गौतमी खडपकर, कला पदवीप्राप्त अभिषेक सावंत, तसेच कला शाखेची पदवीप्राप्त किरण पवार आणि अश्विनी विचारे यांचा गौरव करण्यात आला. वैवाहिक पुनर्वसन झालेले सागर पवार, दानिश काझी आणि अनिकेत कांबळे यांचाही सत्कार केला. Anniversary celebration
