गुहागर, ता. 16 तालुक्यातील मढाळ येथील कुमारी अस्मी संतोष जाधव, वय वर्षे १५, हिची तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील असे अस्मीची आई श्रीमती सनीशा यांना सांगितले. आणि त्यासाठी अंदाजे रू. ७०,०००/- खर्च येईल असेही डॉक्टरांनी सांगितले. कुमारी अस्मी हिचे वडील संतोष जाधव यांचे पाच महिन्यांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले होते. कुटूंबातील कर्ता पुरुष हरपल्यावर अस्मीची आई काबाडकष्ट करून कसातरी घरप्रपंच चालवत होत्या. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. Ankita Chavan lent a helping hand
अस्मी हिच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार तर झालेच पाहिजेत या हेतुने अस्मीची आई मढाळ गावच्या सरपंच सौ. अंकिताताई अजय चव्हाण यांच्याकडे गेल्या आणि अस्मीच्या बाबतीत सविस्तर हकिगत सांगितली. Ankita Chavan lent a helping hand

त्यानंतर मढाळ सरपंच सौ. अंकिता अजय चव्हाण यांनी पुढाकार घेऊन गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. आमदार भास्करशेठ जाधव यांनी सुद्धा शासकीय योजने मार्फत व स्वतः आर्थिक सहकार्य केले. तरीही शस्त्रक्रियेसाठी रू. २५०००/- हजार कमी पडत होते. शेवटी सरपंच अंकिता चव्हाण यांनी गावातील बंधु-भगिनींना आवाहन केले की, अस्मी साठी यथाशक्ती मदतीचा हात पुढे करा. गावातील ग्रामस्थांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद देऊन शस्त्रक्रियांसाठी लागणारी उर्वरित रक्कम जमा केली. त्यामुळे उत्तम प्रकारे दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. Ankita Chavan lent a helping hand
तसेच गावातील अनेक गरजू रुग्णांना शासकीय योजनेतून सरपंच महोदया सहकार्य करतात. माणुसकीच्या दृष्टीने सरपंच महोदया अतिशय चांगले काम करतात, त्या बद्दल आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांनी सुद्धा सरपंच सौ. अंकिताताई अजय चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच आमदार श्री भास्करशेठ जाधव यांनी वेळेवर आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल सरपंच सौ. अंकिताताई अजय चव्हाण यांनी सुद्धा आमदार साहेबांना धन्यवाद देऊन आभार मानले आहेत. सदर प्रसंगी एक हात मदतीचा देऊन सरपंच सौ. अंकिता अजय चव्हाण यांनी अस्मीवर शस्त्रक्रिया करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मढाळ पंचक्रोशीतून सरपंच सौ. अंकिताताई चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. Ankita Chavan lent a helping hand