अंजनवेल नं. २ शाळा सर्वसाधारण विजेते पदाची मानकरी
गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा शाळा वेलदूर घरटवाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धा केंद्रप्रमुख आरोही शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. कबड्डी, खोखो, लंगडी, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळी फेक, धावणे, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकार खेळवण्यात आले. Anjanwel Center Sports Competition
सकाळी नऊ वाजता प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी बोलताना केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम म्हणाल्या की, स्पर्धेच्या या युगात सातत्यपूर्ण सरावामुळेच सुयश प्राप्त होते. सर्व विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करून आपला खेळ खिलाडी वृत्तीने दाखवावा, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यानी सर्वांना धन्यवाद दिले. सर्व विजेते व उपविजेते संघांना व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेते उपविजेते स्पर्धकांना चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. Anjanwel Center Sports Competition
केंद्रातील सर्व शाळांच्या सहभागाने क्रीडाज्योत संचलन करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेसाठी पालक व ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारची मैदाने तयार करण्यात आली होती. आरोही शिगवण यांनी स्पर्धेसाठी लागणारी सर्व चषक तर डॉ मनोज पाटील यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचे चॅम्पियनशिप दिली. घरटवाडी महिला वर्गाने भोजनाची व्यवस्था केली. Anjanwel Center Sports Competition
या स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा समिती अध्यक्ष डॉ मनोज पाटील, सचिव रमेश शिंदे, उपसरपंच राजू शेठ जावळे, ग्रामपंचायत सदस्य श्री मारुती रोहिलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जावळे, केंद्र मुख्याध्यापक निलेश खामकर, मुख्याध्यापक रमेश शिंदे, गणेश विचारे, समीर बामणे, अण्णासाहेब शिंदे, निलेश पाटील, अवधूत राऊतराव ,बलशेठवार, केंद्रातील सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रभू हंबर्डे सर तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आंधळे सर यांनी केले. Anjanwel Center Sports Competition
