कुटुंबासह लुटला कोकणी पर्यटनाचा आनंद
गुहागर, ता. 28 : गुहागरला लाभलेले निसर्गसौंदर्य, लांबलचक आणि स्वच्छ- सुंदर समुद्र किनारा येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. भारताची प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत हिलाही गुहागरच्या पर्यटनाची ओढ स्वस्त बसू देत नसल्याने तिने आपल्या कुटुंबासह नुकतीच गुहागर तालुक्यातील पर्यटनस्थळांना भेट देऊन कुटुंबासह येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. Anjali Bhagwat Enjoyed Guhagar with Family


गुहागर तालुका हा पर्यटनात देशाच्या नकाशावर झळकलेला आहे. दाभोळ पॉवर प्रकल्पामुळे गुहागरचे नाव आंतरराष्ट्रीय स्थरावर कधीच पोहचले आहे. येथील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. तसेच अभिनेत्री, अभिनेते यांना येथील पर्यटनाची ओढ आहे. आता खेळाडूना देखील येथील निसर्गसौंदर्य भुरळ घालू लागले आहे. तालुक्यातील परचुरी येथील सत्यवान देरदेकर यांच्या आजोळ कृषी पर्यटन केंद्रात येऊन भारतीय नेमबाज अंजली भागवत यांनी येथील पर्यटनाचा आनंद घेतला. Anjali Bhagwat Enjoyed Guhagar with Family
या एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. त्यांना नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा आयएसएसफ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार 2002 साली म्युन्शेन येथे मिळाला. 2003 मध्ये मिलान येथे त्यांनी पहिला विश्वचषक जिंकला. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन 2000 सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या नेमबाजपटू सध्या गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी आल्या आहे. Anjali Bhagwat Enjoyed Guhagar with Family