वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी
गुहागर, ता.15 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून बढती व बदली झाली आहे. त्यानिमित्ताने यांचा गुहागर पंचायत समिती सभागृहात सत्कार करण्यात आला. माजी पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Amol Bhosale’s promotion

गटविकास अधिकारी अमोल भोसले हे २०११ ते २०१३ मंत्रालयात सहाययक कक्ष अधिकारी पदावर, २०१३ ते २०१४ साली विक्रीकर निरीक्षक, पुणे. २०१४ ते २०१५ गट विकास अधिकारी म्हणून परिविक्षाधीन कालावधी मध्ये काम पाहिले. सन २०१५ ते २०१६ मध्ये दापोली येथे परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, सन २0१६ ते २०२० मध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सावली, जिल्हा चंद्रपूर, गुहागर पंचायत समिती मध्ये १८ सप्टेंबर २०२० मध्ये रुजू झाले होते. Amol Bhosale’s promotion
गेली दोन वर्षे त्यांनी गुहागर पंचायत समितीच्या माध्यमातून गुहागर तालुका अव्वल स्थानी नेऊन ठेवला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सन हे २०१९/२० साठी अंजनवेल ग्रा. पं. तर २०२०/२१ साठी आरे ग्रा. पं. असा सलग दोन वर्षे दोन ग्रा. पं. ना दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त केले. गुहागर मध्ये कोविड काळात सॅनियंत्रणाचे काम, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक कॅम्पचे यशस्वी आयोजन त्यांनी केले होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बढती मिळालेल्या अमोल भोसले यांना गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. Amol Bhosale’s promotion
