• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

by Ganesh Dhanawade
May 27, 2025
in Guhagar
451 5
0
गुहागर हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
886
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा; शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध

गुहागर, ता. 27 : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. Alumni get-together of Guhagar High School

2000 ते 2001 जवळपास 18 वर्षांनी शिक्षण घेतलेल्यानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पहिला स्नेहमेळावा 12 मे 2019 मध्ये झाला. त्यानंतर 2023 आणि आता तिसरे 2025 मध्ये पार पडले. रविवारी कोकणचे सुप्रसिद्ध मे खातू मसाले उधोग समुहाच्या वरवेली चिरेखाण येथील संकुलामध्ये  आयोजित करण्यात आला होता. गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करीत आहेत. गुहागरात गेले आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत होता. स्नेह मेळावा होईल की नाही, अशी शंका वाटतं असताना पुणे, मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात राहत असलेले माजी विद्यार्थी केवळ मैत्री खातर या स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिले. Alumni get-together of Guhagar High School

सकाळी 9.30 वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वजण गुहागर हायस्कूलमध्ये दाखल झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. याचवेळी कांबळे सरांना सर्वांनी आपला परिचय देत त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. वरवेली येथे गेल्यानंतर माजी विध्यार्थ्यांनी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी विध्यार्थ्यांमधील हौशी विध्यार्थ्यांनी वेगवेगळी गाणी सादर करून स्नेह मेळाव्यास चांगलीच रंगत आणली. तर दुसरीकडे संगीत खुर्ची खेळ खेळण्यात आला. शाळेतील एक एक प्रसंग आठवून त्यावर गप्पागोष्टी झाल्या. यात महत्वाचे म्हणजे या स्नेह मेळाव्यासाठी मुलींची कोणतीच मदत न घेता मुलांनीच सर्व जेवण बनवले होते. संदेश हुमणे याने सर्वांसाठी शाळेचा लोगो असलेली कॅप भेट म्हणून दिली. शेवटी पुढील स्नेहमेळाव्याचे नियोजन करण्यात आले. तसेच येत्या काळात माजी विध्यार्थी या नात्याने गुहागर हायस्कूल मधील गरीब गरजू विध्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शाळेच्या सर्वांगीण विकासात खारीचा वाटा उचलणे, सोबतच माजी विध्यार्थ्यांमधील अडीअडचणी दूर करण्यासाठी योगदान देण्याचे ठरविण्यात आले. Alumni get-together of Guhagar High School

यावेळी श्रीदेवी खातू, धनश्री खरे, प्राजक्ता बारटक्के, अनिता निकम, भाग्यश्री पेठे, पूनम शेटे, प्रज्ञा गडदे, हेमंत बारटक्के, अमित कामेरकर, प्रशांत रहाटे, अंकुश जाधव, शैलेश मोरे, प्रवीण साळवी, अनिकेत लाड, राहुल माळी, संदेश हुमणे, लतीश कचरेकर, मिलिंद कनगुटकर, किरण साळवी, प्रफुल्ल कदम, तेजस वराडकर, सुधीर फडतरे, दिनेश पाडियार आदी माजी विध्यार्थी उपस्थित होते. Alumni get-together of Guhagar High School

Tags: Alumni get-together of Guhagar High SchoolGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share354SendTweet222
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.