डा. श्री. नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडा यांचे मार्फत 8 शाळांना वाटप
गुहागर, ता.19 : डा. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी निमित्त दि. 15 जून रोजी तालुक्यातील 8 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य डाँ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी (Mr. Nanasaheb Dharmadhikari) रेवदंडा यांचे मार्फत देण्यात आले होते. Allocation of educational materials

गुहागर तालुक्यातील असगोली नं. 2, वरचापाट शाळा नं. 2, उर्दुशाळा, आरे देवरहाटी, आरे भंडारवाडा, रानवी, वेलदूर शाळा नं.1, उर्दुशाळा वेलदूर अशा 8 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. एकूण 8 शाळांमध्ये 128 विद्यार्थ्यांना 200 पानी 384 वह्या, 100 पानी 384 वह्या व 128 कंपास पेटी असे साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रतिष्ठित नागरीक, सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक व सदस्य उपस्थित होते. Allocation of educational materials

