गुहागर, ता.17 : कोरोना महामारीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, दप्तर यांची ओढ लागते. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत, या हेतूने गुहागर तालुक्यातील शिवणे येथील माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. Allocation of educational materials

शहरात गेल्यावर माणूस आपल्या गावाला, गावातील माणसांना विसरून जातो. तर शाळेची आठवण दूरच राहिली. या सर्व गोष्टींना फाटा देत शिवणे गावातील माजी विद्यार्थ्यानी अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती या कवितेतील ओळी प्रमाणे शाळेची आठवण ठेऊन. गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्याचा निश्चय केला. यासाठी माजी विद्यार्थ्यानी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन करून निधी गोळा केला. गोळा झालेल्या निधीतून विद्यार्थ्यांना वह्या, पाटी, पेन्सील आदी साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात आले. Allocation of educational materials

या कार्यक्रमाला शिवणे गावच्या सरपंच सौ. मनस्वी महेंद्र ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश पांडुरंग जोशी, उपाध्यक्ष सौ. मानसी मुकेश जोशी, ग्रामपंचायत सदस्य सौ. सानिका संतोष जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक दिनेश जाक्कर यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण सेवक नवनाथ धुळगंडे यांनी केले. Allocation of educational materials
