ज्येष्ठ बालसाहित्यिक सौ.लीला शिंदे यांना अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान
गुहागर, ता. 03 : पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भो. बोरकर यांच्या जन्मगावी बोरी- फोंडा. गोवा (Goa) राज्यामध्ये ५ जून २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ बालसाहित्यिक सौ.लीला शिंदे (Senior Children’s Literary Mrs. Leela Shinde) यांना त्यांच्या निवासस्थानी गोवा येथे श्री.नवदुर्गा मंदिराच्या प्रांगणात शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या (Shivcharan Ujjainkar Foundation) पहिल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान करून शाल व बुके पुस्तक भेट देऊन सौ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. All India Shivmarathi Sahitya Sammelan
या संमेलनाचे अध्यक्षपद राज्य शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ बाल साहित्यिक सौ. लीला शिंदे, औरंगाबाद या भूषवणार आहेत यांचे बाल साहित्यावर विविध प्रकारात ३० पुस्तक प्रकाशित आहेत. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री नवदुर्गा संस्थान बोरी फोंडाचे अध्यक्ष श्यामप्रभू देसाई संमेल नाचे कार्याध्यक्ष सुनील सावकार माजी सरपंच बोरी- फोंडा सह कार्याध्यक्ष जयवंत आडपईकर अध्यक्ष प्रागतीक विचार मंच पणजी तर संमेलनाचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश तळवडेकर सहसंयोजक डॉ. अनिता संतोष तिळवे, गोवा या संमेलनाचे निमंत्रक युवा कामगार नेता एडवोकेट अजितसिंह राणे, यांची निवड करण्यात आलेली आहे. या संमेलनाला गोवा तसेच महाराष्ट्रातून विविध नामवंत साहित्यिक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. All India Shivmarathi Sahitya Sammelan
ज्येष्ठ बालसाहित्यिक सौ. लीला शिंदे यांच्या औरंगाबाद येथील पदमपुरा निवासस्थानी नुकतेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे औरंगाबाद जिल्हा समन्वयक डॉ.सुभाष बागल फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे प्रमुख शाहीर मनोहर पवार जिल्हा विधी सल्लागार तथा सुप्रसिध्द कवी अडवोकेट विजयकुमार कस्तुरे जिल्हा कोषाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध कथाकार बबनराव महामुने औरंगाबाद येथील पदाधिकारी एडवोकेट सर्जेराव साळवे प्रा. जगदीश वेदपाठक आदींनी ज्येष्ठ बालसाहित्यिक सौ.लीला शिंदे यांना त्यांच्या निवासस्थानी गोवा येथे श्री.नवदुर्गा मंदिराच्या प्रांगणात ५ जून रविवार रोजी आयोजित शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पहिल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान करून शाल व बुके पुस्तक भेट देऊन सौ. शिंदे यांचा सत्कार केला. All India Shivmarathi Sahitya Sammelan
या संमेलनाला महाराष्ट्रातून शंभर साहित्यिक रसिकांची उपस्थिती लाभणार असल्याचे या संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे. All India Shivmarathi Sahitya Sammelan तसेच २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे नुकतेच पहिले राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. या संमेलनासाठी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील साहित्यिक रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. All India Shivmarathi Sahitya Sammelan