गुहागर, ता.11 : गुहागर खालचापाट येथील कु. अलंकार अजित विखारे याने खडतर परिस्थितीशी सामना करून बीएसएल एलएलबी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अलंकार विखारे याचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. Alankar Vikhare Passed Advocacy Exam

अलंकार याने इयत्ता १० वी पूर्ण केली. बारावी नंतरच्या काळात गुहागरमध्ये न्यायालय सुरू झाले. तेव्हा वकिलांची संख्याही तुरळक होती. घरातील परिस्थिती अत्यंत बेताची, वडिलांच्या निधनानंतर आई व भावाची जबाबदारी स्वीकारून अँडव्होकेट क्लर्क म्हणून काम सुरू केले. त्यामुळे तालुक्यातील अनेकांशी संपर्क आला. अत्यंत चपळाईने प्रत्येक केसची माहिती अलंकारकडे असे. त्याची चपलाई बघून त्याने वकिलीचे शिक्षण घ्यावे, असे प्रत्येक व्यक्तीला वाटत होते. यासाठी स्व. एडवोकेट वाडकर, अँड. सुधीर चितळे यांच्यासारख्या नामवंत वकिलांनी देखील त्याला प्रोत्साहित केले. रत्नागिरी येथे लॉ कॉलेजला ऍडमिशन घेऊन अभ्यास सुरू केला. एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे कोर्टातील कामे, अशा परिस्थितीत एडवोकेट संकेत साळवी यांच्यामुळे आपण शिक्षण पूर्ण करू शकलो, असे अलंकार याने आवर्जून सांगितले. या यशामध्ये लॉ कॉलेज रत्नागिरीचे सर्व शिक्षक, एडवोकेट संकेत साळवी व कुटुंबीय याचे मार्गदर्शन लाभले. Alankar Vikhare Passed Advocacy Exam

