काळसेकर स्थापत्य अभियांत्रीकी विद्यार्थ्याचे परचुरीत शिबीर
गुहागर, दि. 23 : गुहागर तालुक्यातील आजोळ कृषी पर्यटन केंद्र परचुरी (Ajol Krushi Paryatan Parchuri) येथे प्रात्यक्षिक शिबीरासाठी आलेल्या पनवेल येथील अंजुमन ए इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पसच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर (Anjuman A Islam Kalsekar Technical Campus) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी. गावात एकाहून एक अशा अप्रतिम कलाकृती साकारल्या आहेत. टाकाऊ वस्तूंचा वापर करीत अवघ्या १० हजारात नेत्रदिपक बस थांब्याची उभारणी केली. यासाठी विद्यार्थ्यानी स्वतः श्रमदान करित कमी खर्चात उत्तम कलाकृती साकारता येत असल्याचे दाखवून दिले आहे. AIKTC Student Workshop in Parchuri

पनवेल येथील अंजुमन इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस स्कूल ऑफ आर्किटेक्चर (Anjuman A Islam Kalsekar Technical Campus) चे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी. काही दिवसापुर्वी गुहागर तालुक्यातील परचुरी येथे प्रात्यक्षिक शिबीरासाठी आले होते. हे विद्यार्थी आजोळ कृषी पर्यटन केंद्र परचुरी (Ajol Krushi Paryatan Parchuri) येथे निवासाला होते. या विद्यार्थ्यांमध्ये चिपळूण तालुक्यातील काही विद्यार्थ्याचाही समावेश होता. AIKTC Student Workshop in Parchuri

शिबीरादरम्यान येथील ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी स्मरणात राहील, यासाठी सरपंच स्टॉप येथे बसथांबा बांधावा. अशी सुचना ग्रामस्थांमधून आली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यानी परचुरी येथे नेत्रदिपक असा बसथांबा उभारला आहे. यासाठीचा चिरा ग्रामस्थांनी दिला. उर्वरीत सर्व बाबी विद्यार्थ्यानी उपलब्ध केल्या. बसथांब्याचे बांधकाम करताना विविध वाहनांचे टायर, जांभा, दगड, विविध प्रकारचे जांभ्याचे तुकटे वापरले आहे. काचेच्या बाटल्यापासून ( बॉटल वॉल) भिंत उभारली आहे. AIKTC Student Workshop in Parchuri

याशिवाय टायरच्या माध्यमातून अर्धवर्तुळ आकाराच्या भिंती उभारल्या आहेत. फुटलेल्या लाद्यांचा उपयोग लादीकामासाठी केला आहे. दगडावर कोरिव काम करित ते बसण्यासाठी वापरले आहेत. छतासाठी वॉटरप्रुफ कापडाचा वापर केला. पाणी गळती होणार नाही याची चाचणीही घेतली आहे. याशिवाय ड्राय रबल आणि रॅण्डम रबल चा वापर करून दगडाच्या भिंती उभारल्या आहेत. तसेच चिऱ्याची भिंत आणि शिकण्यासाठी मातीची भिंत, कुडाची भिंत आणि मापाच्या भिंतीही उभारल्या आहेत. विटांचा वापर करून कमान केली आहे. कलर काऊडंग फ्लोअरिंग आयपीएस फ्लोअरिंग, दगडाचा वापर करून लादीकाम केले आहे. AIKTC Student Workshop in Parchuri

या बांधकामाच्या पायथ्यापासून छप्पर पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असलेल्या बिल्डींग कंट्रक्शन विषयातील सर्व मुद्दांचा वापर विद्यार्थ्यानी स्वतः काम करून पुर्ण केले आहेत. या प्रकल्पात कमी खर्चात विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून चांगल्या वास्तूंची निर्मिती करता येते हे दाखवून दिले. यासोबतच बांधकामात नाविन्यताही विकसीत केली आहे. AIKTC Student Workshop in Parchuri

याविषयी बोलताना प्रा. सिद्धेश कोळंबेकर म्हणाले की, परचूरी येथील शिबीरात विद्यार्थ्यानी स्वतःच्या कल्पकतेने बसथांब्यांचे बांधकाम केले. याशिवाय पऱ्याच्या ठिकाणी दगडांमध्ये कोरिव काम करून परिसर सुशोभीत करण्याचा प्रयत्न केला. बांधकामासाठी अनेक टाकाऊ वस्तूंचा वापर करून नेत्रदिपक काम केले आहे. AIKTC Student Workshop in Parchuri

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. सिद्धेश कोळंबेकर यांच्यासह पवन राव, अभिजीत नंबीयार, इंशा शेख, कमलेश गाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर ग्रामस्थांमधून सत्यवान देर्देकर, अब्रार चोगले, आतीश गमरे, यांनी सहकार्य केले. ग्राफिक्स आणि डिझाईनसाठी यतीष चव्हाण, पार्वती चव्हाण, साराह गिनीवाले यांनी काम केले. AIKTC Student Workshop in Parchuri

परचूरी येथील शिबीरात विद्यार्थ्यानी स्वतःच्या कल्पकतेने बसथांब्यांचे बांधकाम केले. याशिवाय पऱ्याच्या ठिकाणी दगडांमध्ये कोरिव काम करून परिसर सुशोभीत करण्याचा प्रयत्न केला. बांधकामासाठी अनेक टाकाऊ वस्तूंचा वापर करून नेत्रदिपक काम केले आहे. AIKTC Student Workshop in Parchuri

