शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषी दूतांचा स्तुत्य उपक्रम
गुहागर, ता. 14 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते दहिवली येथील विद्यार्थ्यांच्या उद्यानविद्या कार्यानुभव उपक्रमांतर्गत शाळा पिंपर क्र १ येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व कृषीदूतांकडून विद्यार्थ्यांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. Agriculture Day celebrated at Pimper School


या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सरपंच अनिलजी घाणेकर, ग्रामविकास अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक आडुरकर सर, देशमुख मॅडम, सय्यद मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. मयुरी मोरे, माजी अध्यक्षा सौ.शमिका घाग व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, प्रकाश मोरे, अनिल मोरे, अशोक घाग, विवेक पवार, मंगेश दवंडे सर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शेतकरी बांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषीतज्ञ प्रा. ॲड. प्रशांतजी पवार सर यांचे सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मोलाचे ठरले. Agriculture Day celebrated at Pimper School