वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामस्थ, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी यांचा सहभाग
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मुंढर येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सलग्न शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय आणि गुहागर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा करण्यात आला. Agriculture Day at Mundhar
ग्रामीण कृषि प्रात्यक्षिक कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शेती विषयी आणि वृक्ष संवर्धन याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने वृक्षारोपण, मी शेतकरी झालो तर, शेतीचे महत्व या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Agriculture Day at Mundhar


कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रमाअंतर्गत शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सोहम शिंदे, केदार ढाने, सूरज गोसावी, आकाश गायकवाड, सागर साळुंखे, राज शिगवण यांनी शेती लागवडी विषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले. या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी श्री. भिलारे, गुहागर कृषी अधिकारी श्री. क्षीरसागर, सरपंच सौ.अमिषा गमरे, मुंढर शाळेचे मुख्याध्यापक श्री.दशरथ कदम, श्री. वैभवकुमार पवार, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. Agriculture Day at Mundhar