गुहागर, ता. 28 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर व ज्ञानदिप महाविद्यालय, खेड यांच्यात सामंजस्य करार नुकताच पार पडला. यावेळी खेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश बागल हे उपस्थित होते. Agreement between MPCOE and Dyandeep

या करारा अंतर्गत विज्ञान आणि उच्च शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, शैक्षणिक कार्यक्रमांवरील माहितीची देवाणघेवाण करणे, त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांशी संबंधित अध्यापन, शैक्षणिक साहित्य आणि इतर साहित्यावरील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करणे, बारावी, एमएच- सीईटी, जेईई आणि परस्पर हितसंबंधांच्या विषयांवर अल्प- मुदतीचा सतत शिक्षण कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आणि त्यात सहभागी होण्यासाठी एकमेकांच्या प्राध्यापकांना आमंत्रित करणे, परस्पर हिताच्या विषयांवर संयुक्तपणे चर्चासत्रे किंवा कार्यशाळा आयोजित करणे इत्यादींचा समावेश आहे. Agreement between MPCOE and Dyandeep
यावेळी खेड येथील ज्ञानदिप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश बागल हे उपस्थित होते. प्रस्तुत कराराच्या यशस्वीतेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, संस्थेचे पदाधिकारी, वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. अमितकुमार माने, प्राचार्य अविनाश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. Agreement between MPCOE and Dyandeep
