• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवानंतर आणखी लोक आमच्याकडे येतील

by Manoj Bavdhankar
August 14, 2025
in Guhagar
179 2
0
After Ganeshotsav party entry frenzy
351
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर

 गुहागर, ता. 14 : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर व तवसाळ गटातील दोन पदाधिकाऱ्यांसह माजी सभापती, सरपंच यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ही तर फक्त प्रवेशाची नांदी आहे. गणेशोत्सवानंतर पक्षप्रवेशाचा धुमधडाका उडणार असून उध्दव ठाकरे गटातील बहुसंख्य कार्यकर्ते शिंदे गटात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख दीपक उर्फ बाबू कनगुटकर यांनी शृंगारतळी येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. After Ganeshotsav, party entry frenzy

कनगुटकर म्हणाले की, वेळणेश्वर गटातील हेदवी हेदवतड येथे उध्द्व ठाकरे गटाच्या झालेल्या मेळाव्यात स्थानिक आमदारांनी पक्ष सोडून गेलेल्या लोकांवर आरोप केले. नेत्रा ठाकूर यांचा नेत्रा बाई असा एकेरी नामोल्लेख केला. विकासाचे ध्येय बाळगून अनेक नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात, म्हणून त्यांना दोष देणे चुकीचे आहे. आपण ज्या ज्या वेळी पक्ष बदलले. तेव्हा कुठे गेली होती निष्ठा, याचा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, अशी टीका कनगुटकर यांनी केली. After Ganeshotsav, party entry frenzy

या मेळाव्यातून आ. जाधव यांनी खारवी समाजाला दोष दिला. आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून का जात आहेत, याचा त्यांनी अभ्यास करुन या भीतीपोटी त्यांनी आमच्या पक्षाच्या पाठोपाठ मेळावा घेतला. पक्ष बदलताना आपण लोकांचा विचार करतो. त्यामुळे नेत्रा ठाकूर वा महेश नाटेकर यांनी पक्षप्रवेश केला तो विकासासाठी. मात्र, त्यांच्यावर टीका करुन विद्यमान आमदारांनी नेते मंडळी व सरकारवर खापर फोडले आहे. मुंबईपासून त्यांचे मेळावे सुरु असून कुठेतरी राजकीय बदल होत ‌असल्याचे त्यांना जाणवू लागले आहे. त्यामुळे ते सातत्याने मेळावे घेत आहेत. मात्र, गुहागरमध्ये बदल हा होणारच असून उध्द्व ठाकरे गटाचे अनेक लोक शिंदे गटात येण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे कनगुटकर यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला गुहागर शहरप्रमुख नीलेश मोरे, अमरदीप परचुरे, काजरोळकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. After Ganeshotsav, party entry frenzy

Tags: After GaneshotsavAfter Ganeshotsav party entry frenzyGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarparty entry frenzyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share140SendTweet88
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.