6 विभागीय आयुक्त कार्यालयांवर एल्गार
गुहागर, ता. 27 : सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय १४ डिसेंबर २०२२ मध्ये स्पष्टता नसलेने याबाबत शुध्दीपत्रक काढणे व इतर मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ हुमन (ऑफ्रोह ) महाराष्ट्र च्या वतीने महाराष्ट्रातील नागपूर ,अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नाशिक या 6 विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘ऑफ्रोह’ने एल्गार पुकारला आहे. Afroh’s dharna movement
‘ऑफ्रोह’च्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 10 ते दु. 5 वाजेपर्यंत सहाही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शांततेत एक दिवसीय धरणे आंदोलन करत असलेबाबतची नोटीस ऑफ्रोहचे राजाध्यक्ष शिवानंद सहारकर सर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते सर, राज्य उपाध्यक्ष देवराव नंदनवार, महासचिव रूपेश पाल, यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सहसचिव डॉ. अनंत पाटील सर, कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, कायदे सल्लागार डॉ. दिपक केदार, ॲड.अनिल ढोले यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्यासह विभागीय आयुक्तांना बजावली आहे. Afroh’s dharna movement
खालील मागण्यांसाठी विषयांकित आंदोलन
१) सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा.
२) महाराष्ट्रातील मुलनिवासी आदिवासींमध्ये परप्रांतीय व धर्मांतरण केलेल्या जातींची घुसखोरी थांबवा.
३) राज्यात ४५ पैकी १० ते १२ जमातींना आरक्षणाचे घुसखोरी करुन फायदे घेतले, त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी.
४) वर्षानुवर्षे अनु. जमातीचे राखीव मतदार संघ तेच ते असलेने OTSP (विस्तारीत क्षेत्रातील) च्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोटेशन पध्दतीने आरक्षण ठेवणे.
५) मा. सर्वोच्च न्यायालयाचे जगदीश बहिरा विरूध्द FCI आदेश दि. ६ जुलै २०१७ पूर्वी विविध शासन आदेशान्वये सेवासंरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुसूचित जमातीची पदे रिक्त केल्यामुळे त्यांना अधिसंख्य पदावरून वगळून नियमित पदावर ठेवणे.
६) सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय १४ डिसेंबर २०२२ मध्ये स्पष्टता नसलेने याबाबत शुध्दीपत्रक काढणे. ७) सरकारी नोकरीसाठी अर्ज करतांना भरावी लागणारी फी कमी करणे. Afroh’s dharna movement
या आंदोलनात ऑफ्रोह व महिला आघाडीच्या सभासदांसह अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘ऑफ्रोह’च्या वतीने प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी केले आहे. Afroh’s dharna movement