येत्या 8 दिवसात निर्णय देतो; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
गुहागर, ता. 21 : दि. 21/12/2019 व 14/12/2022 या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिसंख्य पदावरील व अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवानिवृत्ती वेतन व सेवाविषयक लाभ मिळावेत”, या मागणीसाठी ‘ऑफ्रोह’ ठाणे शाखेच्या वतीने आझाद मैदान येथे दि.26/10/2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. Afroh’s dharna agitation suspended
मुंबई महानगरपालिकेतील कर्मचा-यांच्या मागण्या येत्या 8 दिवसात पूर्ण करून देण्याबाबतचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ‘ऑफ्रोह’च्या शिष्टमंडळाला नागपूर येथे दिल्यामुळे गेल्या 24 दिवसापासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन सायंकाळी स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस व शासनाचे प्रतिनिधी म्हणून आ. विकासजी कुंभारे व आ.प्रवीणजी दटके यांनी नागपूर येथील आमरण उपोषण सुरू असलेल्या मंडपात येवून शासनाचे प्रतिनिधी म्हणून हे आश्वासन दिले. Afroh’s dharna agitation suspended
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची ऑफ्रोहच्या शिष्टमंडळाने नागपूर येथील ‘देवगिरी’ येथे भेट घेतली. नागपूर येथील संविधान चौकात ‘ऑफ्रोह’चे सुरू असलेले आमरण उपोषणकर्त्यांच्या मागण्या व मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेले मुंबई महानगरपालिकेतील कर्मचा-यांच्या मागण्या येत्या 8 दिवसात पूर्ण करून देण्याबाबतचे आश्वासन ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑफ्रोहच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देवून वरील मागण्यासाठी दि.26/10/2023 पासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन दि.18/11/2023 रोजी तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे ऑफ्रोहचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी व कोकण विभागीय कोषाध्यक्ष व सेवानिवृत्त अधिकारी विलास कुंभारे ,प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी जाहीर केले. Afroh’s dharna agitation suspended