• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खातू मसालेने केली पत्त्यांवर जाहिरात

by Mayuresh Patnakar
February 1, 2022
in Guhagar
22 0
0
Advertisement on Playing Cards

Advertisement on Playing Cards

43
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जुन्या कल्पनेला नवा रंग, सर्व उत्पादनांची एकत्रित माहिती

गुहागर, ता. 30 : खातू मसाले Khatu Masale उद्योगाने आपल्या सर्व उत्पादनांची जाहीरात खेळातील पत्त्यांच्या कॅटवर Playing Cards कौशल्याने केली आहे. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात घरोघरी रंगणाऱ्या पत्त्यांच्या खेळासाठी जाहीरात Advertise असलेले पत्ते भेट म्हणून देवून आपली सर्व उत्पादन घराघरात पोचविण्यात हा उद्योग यशस्वी झाला आहे. Advertisement on Playing Cards

पूर्वी जाहिरातीसाठी वृत्तपत्र (Print Media i.e. Newspapers) माध्यमांशिवाय अन्य इलेक्ट्रानिक (Electronic Media) आणि डिजीटल (Digital Media) पर्याय नव्हते. त्यामुळे उत्पादक Manufacturers माहितीपत्रके (Handbills, Leaflet, Broshers, Stickers) स्टीकर, पताका आणि पत्त्यांचा (Playing Cards) वापर जाहिरातीसाठी करत असतं. केंद्र शासनाच्या व्यावसायिक उपक्रमांमधील युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (Unit Trust of India), एलआयसी (LIC) etc या संस्थांनी पत्त्यावर Playing Cards केलेल्या जाहिराती Advertise आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. एका वाहन उद्योगानेही (Mahendra and Mahindra) पत्त्यांवर जाहिरात केली होती. Advertisement on Playing Cards

कालाच्या ओघात जाहिरातीचे हे प्रकार संपले. मात्र Advertisement on the Playing Cards या जाहिरात प्रकाराचा पुर्नवापर खातू मसाले (Khatu Masale Udyog) उद्योगाने कौशल्याने केला आहे. या उद्योगाची अनेक उत्पादने (More then 25 Products including spices) आहेत. मसाल्याबरोबरच गणेशोत्सव, दिवाळी, होळी अशा वेगवेगळ्या सणांमध्ये (Ganesh Festival, Diwali, Holi) वापरता येणारी उत्पादनेही हा Khatu Masale Udyog उद्योग घेतो. त्या सणाच्या निमित्ताने आपल्या उत्पादनांची जाहिरात प्रामुख्याने वृत्तपत्रातून हा उद्योग करतो. परंतू एकाच वेळी आपल्या सर्व उत्पादनांची माहिती ग्राहकापर्यंत कशी पोचवायची याचा विचार सुरु होता. The idea : To deliver information about all products of Khatu Masale Udyog in One Stroke to the customer

Advertisement on Playing Cards

भाद्रपद गणेशोत्सवात आरत्या, नाच यांच्या बरोबरीने गावागावात पत्त्यांचा Playing Cardsखेळ रंगतो. एका कॅटमध्ये 52 पत्ते असल्याने आपल्या सर्व उत्पादनांची जाहिरात Advertise त्यावर करता येऊ शकते. असे कॅट गणेशोत्सवात आपल्या उत्पादनाबरोबर मोफत वाटले तर प्रत्येकाच्या घरात आपण पोचू.  त्यातून पत्त्यावरील जाहीरातीची ( Advertisement on Playing Cards) कल्पना पुढे आली. आपले प्रत्येक उत्पादन ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी पत्त्याच्या कॅटमधील राजा, राणी आणि गोटू ही तीन पाने वगळून उर्वरित 40 पानांवर घरातील संवाद आणि पदार्थाचे चित्र छापण्यात आले आहे. खेळताना सहजपणे हे शब्द कायम डोळ्यासमोर राहील याची काळजी घेण्यात आली आहे. पत्त्याच्या मागच्या बाजूला सर्वाधिक खपाचे उत्पादन आणि उद्योगाची माहिती आहे. अशा पध्दतीने अभ्यासपुर्वक, सहजपणे घरातील गृहिणीपर्यंत आपली उत्पादने पोचविण्याचे काम खातू मसाले Khatu Masale उद्योगने केले आहे. Advertisement on Playing Cards

Tags: Advertisement on Playing CardsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.