गुहागर, ता. 16 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. इयत्ता ५ वी ते १० वी व त्यापुढील 55 विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाईल. छायालयासाठीचे प्रवेश अर्ज शाळा/कॉलेज प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसतिगृहात मिळणार आहेत. अशी माहिती छात्रालय व्यवस्थापनाने दिली आहे. Admission process begins at Guhagar Hostel


संत तुकाराम वसतिगृहात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ५५ विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामध्ये इतरमागासवर्गीय ६५ टक्के, मागासवर्गीय २० टक्के(अनु.जाती/अनु.जमाती),आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय १५ टक्के व दिव्यांग ३ टक्के याप्रमाणे भरावयाचे आहे. सदर छात्रालयात सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यानां प्रवेश दिला जाणार आहे. Admission process begins at Guhagar Hostel


छात्रालयात विद्यार्थ्यांना भोजन, निवास, कपाट, बिस्तारा, बंकबेड, खेळाचे साहित्य, किरकोळ औषधोपचार इ. सुविधा मोफत आहेत. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रगती पुस्तक, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, विद्यार्थ्याचे बँक पासबुक, आयकार्ड साईज फोटो, इ. कागदपत्रांच्या मुळप्रतिसह दोन झेरॉक्स प्रति आणणे आवश्यक आहे. छात्रायलाचा प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांसोबत पालकही छात्रालयात हजर रहाणे आवश्यक आहे. प्रवेशांची संख्या मर्यादित असल्याने ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात रहावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांनी तातडीने संत तुकाराम छात्रालयाच्या कार्यालयात संपर्क साधावा. Admission process begins at Guhagar Hostel


अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०१५३५७९, ८४२१०५७६२५ अथवा stc.guhagar@gmail.com या ई-मेल वर अथवा संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन छात्रालय व्यवस्थापनाने केले आहे. Admission process begins at Guhagar Hostel