गुहागर, ता.19 : तालुक्यातील नामांकित मुंबई विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त ( माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख असलेले गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे-ढेरे भोसले (KDB) महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. Admission in KDB College

आधुनिक जगाकडे वळताना आज प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. हीच काळाची गरज ओळखून गुहागर तालुक्यातील खरे-ढेरे भोसले महाविद्यालयाने (Khare-Dhere Bhosle College) माहिती तंत्रज्ञान विभागाला अधिक चालना दिली आहे. ह्या विभागात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ काळात विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच आपल्या विद्यालयातील गुणवत्ता पूर्ण विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पदावर काम करता यावे, यासाठी नामांकित कंपन्यांना देखील आमंत्रित केले आहे. कोरोना महामारीच्या २ वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा १००% क्षमतेने महाविद्यालये चालू झाली आहेत. खरे – ढेरे – भोसले महाविद्यालय (Khare-Dhere Bhosle College) हे गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला अधिक महत्व देणारे म्हणुन ओळखले जाते. आधुनिक जगातील महत्वाचा घटक माहिती तंत्रज्ञान (IT) शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया चालु झाली आहे. विदयार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. Admission in KDB College
Admission in KDB College
गेली अनेक वर्षे ह्या महाविद्यालयाचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जनजागृती घडवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत आणि कर्मचारी वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्याचा ग्रामीण भाग आणि तेथील जीवनशैली यांचा अभ्यास करून आपल्या सहकार्यांना वेळोवेळी योग्य मार्गदशन हे प्रभारी प्राचार्य डॉ . अनिल सावंत करताना दिसतात. कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या शाखा आणि माहिती तंत्रज्ञान ( IT) व्यावसायिक शाखा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी तसेच कॅम्पस इंटरव्हूय विविध प्रकारची प्रशिक्षणे, करीयर गाईडन्सची मार्गदर्शनपर शिबीरे, NSS कॅम्प, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन महाविद्यालयामार्फत वेळोवेळी केले जाते. Admission in KDB College

तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल सावंत आणि गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. महेश भोसले यांनी केली आहे. Admission in KDB College
