मंत्री सामंत, परब आणि आमदार जाधव यांना विश्वास
गुहागर, ता. 06 : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे वेळणेश्र्वर येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि आमदार भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरें यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी नेतृत्व मुख्यमंत्री असा केला. शिवसेनेतील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या उल्लेखामुळे भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. Aditya Thackeray is Future Leader


आठ दिवसांपूर्वी वेळणेश्र्वर येथील धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यासाठी युवासेवा प्रमुख आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे येथे आले होते. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. आपल्याशी अनेक वेळा चर्चा होते. या चर्चेतून लक्षात येते की अनेक विषयांची सखोल माहिती तुमच्याकडे असते. तुम्ही वाचन करता, अभ्यास करता. माहिती घेता, मेहनत करता. त्यामुळे एक ना एक दिवस तुम्ही राज्याचे नेतृत्त्व कराल. असा विश्र्वास वाटतो. असे प्रतिपादन आ. जाधव यांनी केले. Aditya Thackeray is Future Leader


उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील असल्याने आपल्याला महाराष्ट्र फिरण्याची आवश्यकता नाही. असा विचार न करता मी जनसामान्यातला आहे. जनसामान्यांसोबत माझी नाळ जुळलेली आहे. आणि जनसामान्यात राहुन मला महाराष्ट्राचे नेतृत्त्व करायचे आहे. या भावनेने तुम्ही काम करत आहात. एवढा जमिनीवर असलेला आणि नम्र नेता मी वीस वर्षात पाहिला नाही. धावपळीच्या दौऱ्यातही आपण शिवसैनिकांना, अधिकाऱ्यांना, पत्रकारांना भेटता. त्यामुळे तुमचे नेतृत्त्व महाराष्ट्रातील जनतेला आवडेल. Aditya Thackeray is Future Leader


पालकमंत्री ॲड. अनिल परब म्हणाले की, आमदार जाधव यांनी सांगितले ते सत्य आहे. आदित्य ठाकरे आमचे नेते आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंचा नातू, मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील समस्यांची जाण त्यांना आहे. राज्याचे प्रश्र्न सोडविण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आम्ही ते अनेक वर्ष जवळून अनुभवतोय. महाराष्ट्राचे भवितव्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पहातोय. Aditya Thackeray is Future Leader


एकाच व्यासपीठावरुन या तिन्ही नेत्यांनी आदित्य ठाकरेंना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी व्यासपीठानर उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पुढच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री असतील का अशी चर्चा सुरु झाली आहे. Aditya Thackeray is Future Leader