गुहागर, ता. 17 : गुहागर पोलीस ठाणे येथे वार्षिक निरीक्षण तपासणी अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक सो रत्नागिरी यांनी गुहागर पोलीस ठाणेस भेट देऊन परेड निरीक्षण तसेच दप्तर तपासणी घेण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने सर्व पोलीस पाटील, सामाजिक सलोखा समिती सदस्य, जेष्ठ नागरिक यांची मीटिंग घेऊन गुहागर पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, सामाजिक सलोखा शांतता अबाधित राहील याबाबत मार्गदर्शन केले. Additional Superintendent of Police visits Guhagar Police Station

यावेळी सामाजिक सलोखा समिती गुहागर चे सदस्य साबीरभाई साल्हे रा. शृंगारतळी यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केल्याने व सर्व समाजामध्ये एकता नांदावी याप्रकारे काम केल्याने त्यांना माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो रत्नागिरी यांचे हस्ते मोमेंटो, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे शृंगारतळी येथील ॲम्बुलन्स चालक रात्री अपरात्री केव्हाही अपघात घडला किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळाल्या करता प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे श्री. रहीम मेमन यांनाही मोमेंटो, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. Additional Superintendent of Police visits Guhagar Police Station

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सो रत्नागिरी यांनी गुहागर पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून चांगल्या कामगिरी बाबत अधिकारी अंमलदारांचे कौतुक केले. व यापुढेही गुहागर पोलिसांकडून उत्तम कामगिरी व्हावी याकरता शुभेच्छा देण्यात आल्या. Additional Superintendent of Police visits Guhagar Police Station

