गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या गटात झोकून देवून काम करत आहेत. या जि.प. गटातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात त्यांचा जीवंत संपर्क आहे. अनेक विकास कामांबरोबरच कोरोनाच्या लाटेत त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. आपल्या जिल्हा परिषद गटाला कुटुंब मानणाऱ्या सौ नेत्रा ठाकूर यांचा सर्वसामान्य गृहिणी ते लोकसंग्राहक लोकप्रतिनिधी, कार्यतत्पर जिल्हा परिषद सदस्या हा प्रवास कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेने यावर्षीच त्यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरविले. Active Women Politician Natra Thakur


वेळणेश्र्वर जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांचे माहेर शीरला. वडिल सुरेश हरिश्चंद्र भाटकर शिवसैनिक एवढीच माहेरची राजकीय पार्श्र्वभुमी. त्यांचा विवाह वेळणेश्र्वर मधील नवनीत ठाकूर यांच्याबरोबर झाला. नवनीत ठाकूर हे सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक. त्यांचाही सक्रीय राजकारणाशी फारसा संबध नव्हता. 2007 जिल्हा परिषद निवडणुकीत वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटात महिला आरक्षण पडले. तेव्हा तत्कालिन सभापती कै. नंदकिशोर पवार यांच्या आग्रहामुळे ठाकूर दाम्पत्य अपघाताने राजकारण आले. या निवडणुकीत सौ. नेत्रा ठाकूर यांचा 371 मतांनी पराभव झाला. मात्र या पराभवातून खचून न जाता आता राजकारणात यशस्वी व्हायचेच असा चंग बांधून सौ. नेत्रा ठाकूर कामाला लागल्या. दरम्यान 2009 मध्ये आमदार भास्कर जाधव गुहागरच्या राजकारणामध्ये सक्रीय झाले. ते ठाकूर दाम्पत्याच्या पाठीशी उभे राहीले. त्यांचे मार्गदर्शन आणि ठाकूर दाम्पत्याची मेहनत या बळावर सौ. नेत्रा ठाकूर यांनी 2012 जिल्हा परिषद निवडणूकीत विजय मिळविला. पुढे 2017 च्या निवडणुकीत विकास कामे, जनसंपर्क या बळावर त्या सहज निवडून आल्या. Active Women Politician Natra Thakur : (click and see)


उत्तम जनसंपर्क
आज सौ. नेत्रा ठाकूर आणि वेळणेश्र्वर जिल्हा परिषद हे एक प्रेमाचे, विश्र्वासाचे रसायन तयार झाले आहे. जिल्हा परिषद गटातील प्रत्येक घरात सौ. नेत्राताईंचा संपर्क आहे. विवाह, बारसे, वाडीपूजा आदी सणसभारंभांपासून ते संकटात आणि दु:खाच्या प्रसंगात सर्वप्रथम उपस्थित रहाणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. सहा महिन्यांपूर्वी साखरीआगरमधील एका नौकेला अपघात झाला. 6 खलाशी बेपत्ता झाले. ही घटना घडल्यानंतर आजपर्यंत दुर्दैवी मृत्यू झालेल्या खलाशांच्या घरामध्ये सौ. नेत्राताई जात आहेत. मृत खलाशांचे मृत्यू दाखले मिळावेत म्हणून स्वखर्चाने न्यायालयीन प्रक्रियेसाठी मृतांच्या नातेवाईकांना त्या मदत करत आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील.Active Women Politician Natra Thakur


विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी
सामान्यपणे एखादे विकासकाम घेवून कार्यकर्ते आले की ते विकासकाम शासनाकडे पाठवून दिले की लोकप्रतिनिधी थांबतो. त्यानंतरचा पाठपुरावा जनतेलाच करावा लागतो. परंतु सौ. नेत्रा ठाकूर पहिल्या टप्प्यापासून कामाची निविदा निघेपर्यंत पाठपुरावा करतात. आमदार भास्कर जाधव यांनी अनेक सभांमधुन नेत्राताईंच्या या पाठपुराव्याचे कौतुक जाहीरपणे केले आहे. जिल्ह्यातील एकमेव भुसंपादन होवून वेळणेश्र्वरमधील खारवीवाडीतील रस्ता त्यांनी केला. जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन आणि आमदार भास्कर जाधव यांच्यामार्फत वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटात 4 कोटी 56 लाख 21 हजार रुपयांची 78 विकासकामे केली आहेत. त्यापैकी 2 कोटी 98 लाख 1 हजाराची कामे झाली आहेत. तर 1 कोटी 58 लाख 20 हजाराची कामे मंजूर झाली आहेत. तसेच आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून 16 कोटी कामे मंजूर झाली आहेत.
वेळणेश्र्वर खारवीवाडीतील धुपप्रतिबंधक बंधारा आणि साखरीआगरमधील जेटी ही कामे करणे हे सौ. नेत्राताईंचे स्वप्न होते. ही कामे मोठी असल्याने शासनाकडून मंजुरी मिळणे आवश्यक होते. आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे, शासनाकडून निधी दिल्याने आज कामांना मंजुरी मिळाली आहे. आपले स्वप्न आमदारांनी पूर्ण केल्याचे नेत्राताई मोकळेपणाने सांगतात. Active Women Politician Natra Thakur (Click and SEE)
कोरोनायोद्धा
दोन वर्ष आलेल्या कोरोना संकटातही नेत्राताईंनी आदर्श काम केले. पहिल्या लाटेत शासनाकडून योजना येण्याआधीच जिल्हा परिषद गटातील प्रत्येक घरात डॉक्टर, नर्स आणि रुग्णवाहिका असे पथक त्यांनी पाठविले. प्रत्येक ग्रामस्थाची तपासणी केली. आवश्यक औषधे पुरविली. गटातील प्रत्येक गावात ग्रामसमित्या मजबुत केल्या. मुंबईतील चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांचे सहकार्य घेतले. गावागावत विलगीकरण कक्षांची उभारणी केली. सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा केला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली. यावेळी गटातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची टीम उभी केली. कोरोना रुग्णांना कामथे, चिपळूण, रत्नागिरी येथील कोविड रुग्णालयात बेड मिळावा म्हणून आमदार जाधव यांच्या सहकार्याने प्रयत्न केले. शासनाकडून आवश्यक साहित्य कोविड केअर सेंटरला मिळवून दिले. त्यांच्या या कामाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. अशाप्रकारे आपल्या जिल्हा परिषद गटाला कुटुंब मानुन आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण सौ. नेत्रा ठाकूर यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्या नेहमीच नवनीत ठाकूर, आमदार जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, वडिल सुरेश भाटकर, भाऊ संदेश भाटकर, जिल्हा परिषद गटातील सर्व सहकारी यांना देतात. या सर्वांची साथ मिळाल्यानेच मी सर्वस्पशी काम करु शकले. असे नेत्राताई आदराने सांगतात. Active Women Politician Natra Thakur