शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक आनंद भोजने यांचे वनअधिकारी यांना निवेदन
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांची मानव वस्तीकडे वाटचाल , शेतींचे आणि बागायतींचे नुकसान याबाबत शिवस्वराज्य शेतकरी संघटना आक्रमक वनविभागाने त्वरीत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा गंभीर इशारा शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.आनंद भोजने यांनी दिला आहे. Action should be taken against those who destroy forests
दुर्गम भागात आणि डोंगराळ भागातील भरमसाठ जंगलतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पावसाचे प्रमाण कमी होत असून सुका दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामूळे शेतीचे प्रमाण घटले असून गुहागर तालुक्यात बेकायदेशीर लाकुड तोड करणारे व परिमंडळ वनअधिकारी गुहागर तसेच विभागीय वनअधिकारी चिपळूण तसेच परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी हे एकमेकांशी संगनमत करुन पर्यावरणाचा -हास करीत असून गुहागर तालुक्यातील भरमसाठ आणि बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे वाटचाल सुरू झाली असून बचतगटाच्या माध्यमातून शेती करणा-या व वैयक्तिक शेती करणा-या शेतकऱ्यांच्या शेतीचे व बागायतीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. Action should be taken against those who destroy forests

शिवस्वराज्य शेतकरी संघटना तालुका गुहागर हि शेतकरी संघटना शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक झाली असून वनविभागाने जंगलतोड करणा-यांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथ: आंम्ही तुमचे विरोधात शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणासारखी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन करावे लागेल याला सर्वस्वी जबाबदार आपणच रहाल असा गंभीर इशारा शिवस्वराज्य शेतकरी संघटना तालुका गुहागर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.आनंद गोविंद भोजने यांनी मान.परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांना लेखी निवेदन दिले. Action should be taken against those who destroy forests
या निवेदनाच्या प्रती ई-मेल पत्राव्दारे १)मान.शशिकांतजी चव्हाण साहेब – शिवसेना जिल्हाप्रमुख, रत्नागिरी जिल्हा,२) मान.जिल्हाधिकारी साहेब – जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी ३) मान. पोलिस अधीक्षक साहेब- कार्यालय रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी ४) मान.विभागीय वनअधिकारी साहेब – रत्नागिरी जिल्हा कार्यालय – चिपळूण, ५) मान.उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय चिपळूण,६)मान. तहसिलदार साहेब तहसील कार्यालय गुहागर,८) मान.पोलीस निरीक्षक साहेब, पोलिस ठाणे गुहागर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांना ई-मेल पत्राव्दारे दिला आहे. Action should be taken against those who destroy forests
