रस्त्याजवळून जाणाऱ्या धोकादायक केबलच्या सर्व्हेची मागणी
Guhagar News: Accidental death of Satesh तालुक्यातील असगोली मधलीवाडी येथील सतेश किसन घाणेकर (वय 38) हा तरुण गुरुवारी (ता. 18) रात्री 8.00 दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मेंदुला इजा झाली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 19) दुपारी त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. 20) सकाळी असगोली येथे शोकाकुल वातावरण सतेशवर अंत्यसंस्कार करण्यात आला. या तरुणाच्या मृत्यूने महानेट योजनेच्या लोंबकळणाऱ्या केबलबाबत प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले आहे. Accidental death of Satesh
सतेशचा अपघाती मृत्यू
गुहागर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटला जोडण्यासाठी रस्त्याच्या बाजुने महानेट केबल टाकण्यात आली आहे. या महानेटच्या केबलनेच सतेश घाणेकरचा नाहक बळी घेतला. गुरुवारी सतेश गुहागरातून असगोलीला जात होता. यावेळी त्याच्याबरोबर दुचाकीवर त्याचा लहान मुलगा होता. असगोली मधली वाडी येथे असगोली कडून गुहागर कडे एक टेंम्पो येत होता. रस्त्याच्या बाजूला खाली लोंबकळणारी महानेटची केबळ या टेम्पोत अडकून तुटली आणि तिचा फटका सतेशच्या दुचाकीला बसला. ही केबल इतक्या वेगाने येऊन आपटली की सतेश दुचाकीवरुन तोल जावून मुलासह खाली पडला. यामध्ये सतेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर मुलग्याला किरकोळ दुखापत झाली. याचवेळी रस्त्यावर असणाऱ्या अन्य दोघांनाही किरकोळ प्रमाणात दुखापत झाली. Accidental death of Satesh
सतेशला तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर तातडीने चिपळूण व त्यानंतर कराड येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. कराड येथे त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री त्याचा मृतदेह असगोलीला आणण्यात आला व शनिवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 38 वर्षीय सतेशच्या पश्चात त्याची पत्नी व दोन लहान मुले आहेत. सतेश जमीन विक्रीचा व्यवसाय करत असे. मनसे या राजकीय पक्षाचे कामही तो करु लागला होता. घरातील कमावता, उमद्या वयाच्या सतेशच्या मृत्यूनंतर या लहान मुलांची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आणि घाणेकर कुटुंबावर आली आहे. गावात सर्वांशी मिळुन मिसळून वागणाऱ्या सतेशच्या अचानक जाण्याने असगोली गावावर शोककळा पसरली आहे. Accidental death of Satesh
महानेटच्या केबलबद्दल प्रश्र्नचिन्ह
केबल तुटल्याने झालेल्या अपघात निर्दोष सतेशचा मृत्यु झाल्याने महानेटच्या केबल ओढण्यात किंवा देखभाल करण्यात ठेकेदाराने केलेला निष्काळजीपणा समोर आला आहे. असगोलीकडे जाताना जांगळवाडी बस स्टॉप समोर, आरेकरांच्या घरासमोर, असगोली पुलाजवळ व प्रदेश तांडेल यांच्या घरासमोरही अशाच प्रकारे महानेटची केबल रस्त्याच्या बाजुला लोंबकळताना दिसते. त्यामुळे अशा प्रकारचे अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकेल. ही केबल काही ठिकाणी महावितरणच्या पोल वरून गेलेली तर काही ठिकाणी सपोर्ट म्हणून पोल उभारुन टाकण्यात आली आहे. महावितरणच्या पोल वरील या केबलची ब्रॅकेट अनेक ठिकाणी तुटलेली आहेत. वास्तविक ही केबल टाकताना महावितरणच्या दोन पोल मध्ये एक पोल उभा करणे गरजेचे होते. केबल टाकल्यानंतर त्या केबलची सातत्याने देखभाल करणे गरजेचे होते. केबल टाकताना रस्त्याच्या जवळून जाणाऱ्या केबलवर दोन ग्रामस्थांनी हरकतही घेतली होती. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून, वहातुकीला अडथळा ठरु शकेल याचा विचार न करता या केबल टाकण्यात आल्या आहेत. गुहागर तालुक्यात सर्वच ग्रामपंचातींपर्यंत या केबल ओढण्यात आल्या आहेत. त्यामुळे सतेशच्या दुर्देवी मृत्युनंतर तालुक्यातील रस्त्याच्या जवळून गेलेल्या केबलचा सर्व्हे करावा आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या केबल ठेकेदारांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. Accidental death of Satesh