• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पुतणीला भेटण्याआधीच काकाला मृत्युने गाठले

by Manoj Bavdhankar
May 9, 2022
in Guhagar
19 0
0
पुतणीला भेटण्याआधीच काकाला मृत्युने गाठले
37
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळंबच्या महेशचा चिपळूणात अपघाती मृत्यू

गुहागर, ता. ९ :  चुलत बहिणीच्या लग्नासाठी येणाऱ्या पुतणीला आणण्यासाठी महेश चिपळूण रेल्वेस्थानकावर चालला होता. पण चिपळूण शहरातील नाथ पै चौकात आयशरच्या रुपाने आलेल्या मृत्यूने महेशचा घात केला. आणि लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. महेशच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई, वडील असा परिवार आहे. Accidental death

गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रहाणारा महेश प्रभाकर गुरव (वय ४३) इलेक्ट्रीफिकेशन, पंप दुरुस्ती आदी कामे करत असे. मंगळवारी वेळंबला महेशच्या चुलत बहिणीचे लग्न होते. सोमवारी लग्न घरात साखरपुड्याचाही कार्यक्रम होता. या समारंभासाठी महेशची पुतणी मुंबईहून रेल्वेने पहाटे चिपळूणला उतरणार होती. तिला आणण्यासाठी महेश पहाटे दुचाकी घेवून चिपळूण रेल्वेस्थानकावर चालला होता.

Accidental death

चिपळूण बाजारपेठेतील नाथ पै चौक येथे सोमवारी (ता. 9) पहाटे चारच्या सुमारास आयशर गाडीची महेशच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेत महेश गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संबंधीत आयशर चालक गाडीसह तेथून पसार झाला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या काहीजणांनी आयशरचा पाठलाग गेला. मात्र तो हाती लागला नाही.

ही घटना वेळंबला समजाताच गुरव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेशला दोन लहान मुले आहेत. त्याच्या चुलत बहिणीचे लग्न असल्याने वेळंबला सगेसोयरे जमले आहेत. अपघातासारख्या दुर्देवी घटनेमुळे लग्नघरात सन्नाटा पसरला आहे. Accidental death

दरम्यान चिपळूणचे पोलीस अपघात करुन पळून जाणाऱ्या आयशरचा शोध घेत आहेत. संबंधीत आयशर चालक हा रत्नागिरीहून मुंबईकडे आंब्याची वाहतूक करणारा होता. असा अंदाज पाठलाग करणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील सीसीटिव्हीचे फुटेज पोलीस तपासात आहेत. अपघात घडल्यानंतर माणुसकी न दाखवता पळून गेल्याने या चालकावर कडक कलमे लावावीत अशी मागणी गुरव कुटुंबियांनी केली आहे. Accidental death

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.