पाटपन्हाळेत व्हॅनची धडक टाळताना घडला अपघात
गुहागर, ता. 18 : Accident in Patpanhale तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी फलकावर आपटले. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुहागर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.
Accident in Patpanhale
गुहागर शृंगारतळी मार्गावर पाटपन्हाळे एस.टी. थांब्याच्या आधी परचुरे यांच्या घरालगत शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी 4 च्या दरम्यान हा अपघात झाला.(Accident in Patpanhale) मोडकाआगर कडून येणाऱ्या व्हॅनला (MH12 DE 0192) उजवीकडे परचुरे यांच्या घराच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्याला वळायचे होते. ही व्हॅन नरवण येथील माजी सैनिक भार्गव जोशी चालवत होते. व्हॅन वळत असतानाच शृंगारतळीकडून गुहागरकडे भरधाव वेगाने दुचाकी (MH08 AD 4750) येत होती. या दुचाकीवर कल्पेश मालप, रा. वरवेली आणि वैभव जोशी रा. गुहागर किर्तनवाडी हे दोन तरुण होते. दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने अचानक समोर वळणारी व्हॅन पाहिली. व्हॅनची धडक टाळण्यासाठी त्यांने गाडी बाजुला घेतली. तरीदेखील व्हॅनची निसटती धडक बसली. वेगामुळे अनियंत्रीत झालेली दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या एका लोखंडी फलकावर जावून आपटली. या धडकेने लोखंडी फलक जमीनीतून उखडला. दुचाकीवरील दोघांच्या अंगावर पडला. दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या वहाळातील बांधावर जावून आपटली. लोखंडी फलक एकाच्या डाव्या पायावर तर दुसऱ्याच्या हातावर पडला. त्यामुळे दोन्ही दुचाकीस्वार जागीच जायबंदी झाले.

हा अपघात (Accident in Patpanhale) घडल्यानंतर शृंगारतळीत शिवपादुकांचे स्वागत करण्यासाठी निघालेले शिवप्रेमी तेथे थांबले. काहींनी तातडीने शासकीय रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र सदर रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकली नाही. अखेर बांधकाम व्यावसायिक गुलाम तांडेल यांनी आपल्या वाहनातून दोघांना चिपळूणमधील खासगी रुग्णालयात नेले. अपघाताचे वृत्त कळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम घटनास्थळी पोचले होते. मात्र सायंकाळी 7 वाजेपर्यंत गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. (Accident in Patpanhale)
