सुदैवाने कोणीही जखमी नाही
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोलीपासून 1 कि.मी. अंतरावर चारचाकी माल वहातुक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. ही घटना सोमवारी, ता. 11 एप्रिलला दुपारी 3.30 च्या दरम्यान घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही. Accident in Abaloli


सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाल्याने गावागावातून चारचाकी वाहनाने मुंबई पुण्यात आंबा वहातुक सुरु झाली आहे. तवसाळ, पडवे परिसरातील एक चारचाकी माल वहातुक करणारी गाडी मुंबईला आंबा घेवून गेली होती. मुंबईत आंबा पोचवून येताना आबलोली कडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीत या वाहनाला अपघात झाला. रविवारी सायंकाळी आंबा घेवून मुंबईत जाणे. सोमवारी सकाळी व्यापाऱ्याकडे आंबा पोच करुन पुन्हा गावाकडचा प्रवास उन्हातून झाल्यामुळे वाहनचालक थकला असावा. घरापर्यंत पोचल्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या चालकाला वाहन रस्त्यावरुन बाजुला गेल्याचे लक्षात आले नाही. साईडपट्टीवर असलेल्या दगडाच्या दणक्याने अनियंत्रीत वाहन पलटी झाले. यावेळी वाहनामध्ये चालकासह आणखी एकजण होता. पलटी झालेल्या गाडीतून दोघेही सुखरुप बाहेर पडले. Accident in Abaloli


वाहनाला अपघात झाल्याचे कळवल्यावर ग्रामस्थ आले. दोघांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी पाठवून दिले. आणि अवघ्या दोन तासात अपघातग्रस्त वाहन देखील अपघात स्थळावरुन उचलण्यात आले. त्यामुळे हे वाहन कोणाचे होते. कोण चालवत होता. अपघात नेमका कसा घडला. याबाबतची माहिती मिळु शकलेली नाही. सदर अपघाताची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही. Accident in Abaloli