कामाचे बिल काढण्यासाठी मागितली होती 7 हजाराची लाच
गुहागर, ता. 16 : ACB Arrests Deputy Engineer in Bribe Case. तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कामाचे रनिंग बिल काढण्यासाठी लाच मागणारे गुहागर पंचायत समिती मधील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सळमाखे मंगळवारी लाच घेताना रंगेहात मिळून आले आहेत. लाचलुचपत विभाग रत्नागिरी (एसीबी) यांनी ही कारवाई करून संजय तुळशीराम सळमाखे यांना अटक केली आहे.
गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतचे पत्रा शेडच्या कामांतर्गत साडेतीन लाखाचे रनिंग बिल काढण्यासाठी सात हजार रुपयाची लाच मागितली होती. शुक्रवारी (ता. 12 डिसेंबरला) काम करणारा उप ठेकेदार यांना संबंधित कागदपत्रावर सही करण्याचा नकार दिला. दोन वेळा केबिनच्या बाहेर पाठवले. हे रनिंग बिल आहे. शेवटचं बिल काढताना कोणतीही रक्कम देऊ नको, पण मला आता कोणत्याही परिस्थितीत 7000 रुपये दे. अशा पद्धतीची मागणी उप अभियंता सळमाखे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती. संबंधित तक्रारदार यांनी शुक्रवारीच लाच लुचपत विभाग रत्नागिरी (Anti Corruption Bureau, Ratnagiri) यांच्याजवळ संपर्क साधून संपूर्ण हकीगत सांगितली. त्याप्रमाणे मंगळवारी लाच लुचपत विभागाने पैशाच्या देवाण-घेवाणीवर सापळा रचला. ACB Arrests Deputy Engineer in Bribe Case

असा रचला सापळा
मंगळवारी (ता. 16) सकाळी वेळंब ग्रामपंचायतीच्या पत्रा शेडचे कामाचे रनिंग बील मागणारा तक्रारदार कामाच्या फोटोवर राहिलेली सही घेण्यासाठी गुहागर पंचायत समितीमधील जि.प. बांधकामच्या कार्यालयात गेला. त्यावेळी उपअभियंता संजय तुळशीराम सळमाखे यांनी पुन्हा एकदा कागदपत्रावर ग्रामसेवकाची सही नाही असे सांगून तक्रारदाराला बाहेर काढले. त्यानंतर तक्रारदारादे ग्रामसेवकाची सही आणलेला कागद घेऊन पुन्हा सळमाखे यांची भेट घेतली. त्यावेळी रक्कम आणली का असे सळमाखे यांनी विचारले. तक्रारदार यांनी सळमाखे यांना रुपये सात हजार दिले. ही रक्कम सळमाखे यांनी स्वीकारली. रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी उप अभियंता सळमाखे यांना ताब्यात घेतले. स्विकारलेल्या रक्कमेची चौकशी केली. सळमाखे यांच्याकडे ही रक्कम सापडल्यावर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर लाच घेऊन अटक केली आहे याबाबतची अधिक कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअभियंता संजय तुळशीराम सळमाखे यांना अटक केली. ACB Arrests Deputy Engineer in Bribe Case

सदरची सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, सहा. पो. फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार दिपक आंबेकर, पोलीस शिपाई राजेश गावकर व हेमंत पवार यांनी केली. ACB Arrests Deputy Engineer in Bribe Case
