वृत्तपत्राशी संबधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील पिग्मी संकलन करणाऱ्या विवाहीतेला धमकी देणे व अश्लिल भाषेत शिवगाळ केल्याप्रकरणी वृत्तपत्राशी संबंधित एका तरुणाविरोधात गुहागर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विवाहितेने याबाबतची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात केली होती. Abusing a married woman
गुहागर तालुक्यातील एका पिग्मी संकलन करणाऱ्या महिलेने गुहागर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे हा तरुण, तु मला खुप आवडतेस, माझ्याशी फोनवर बोल, अन्यथा घरी येऊन राडा करेन, तु मला भेटायला ये, शृंगारतळी येथे भाडयाची रूम घेऊ रहा. अन्यथा तुला संपवून टाकेन असे सांगत अश्लिल शिवीगाळ करत असे. त्याचबरोबर पिग्मी संकलनासाठी गेल्यावर माझी पाठलाग धरत असे. एके दिवशी त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. याबाबत चुलत दिरांना मी सांगितले. त्यांनी फोन केल्यानंतर शिंदेने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर दोन तासाने मोबाईल आणून दिला. शिंदे अनेकवेळा, मी पत्रकार आहे माझी खुप ओळख आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. अशी धमकी देत असे. अश्लिल भाषेत शिवीगाळ करत असे. सतत सुरु असलेल्या या प्रकाराला कंटाळून अखेर मी १८ जानेवारी रोजी माझ्या पतींना हा प्रकार सांगितला. त्यानंतर १९ जानेवारी रोजी याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. Abusing a married woman
या तक्रारीवरुन गुहागर पोलिसांनी उमेश प्रभाकर शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८, ७९, ३५१ ( १ ) व ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हेडकॉस्टेबल लुकमान तडवी अधिक तपास करत आहेत. Abusing a married woman