राजा हिंदुस्थानी मंडळाचे आयोजन, उपविजेता विधाता,असगोली
गुहागर, ता.11: अब्दुल गनी शृंगारतळी संघाने कै मारूती (बंधू) आडाव स्मृती चषक जिंकला. कोतळूक मधील राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडीने कै मारूती (बंधू) आडाव यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते. विधाता असगोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Abdul Gani team winner in Kotlok competition
गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील ना.गोपाळकृष्ण गोखले क्रिडानगरीत ५ दिवस सामने खेळवले गेले. या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती माजी सभापती विलास वाघे, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम विजेत्या अब्दुल गनी संघाला रोख रूपये ५५ हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या विधाता असगोली संघाला रोख रूपये ३३ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. Abdul Gani team winner in Kotlok competition
मालिकावीर म्हणून मयुर वाघमारे, फलंदाज कुंदन रोहिलकर, गोलंदाज ओंकार बागकर, क्षेत्ररक्षक रोहित रोहिलकर, अंतिम सामना सामनावीर अमित पवार यांना चषक व टि शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. Abdul Gani team winner in Kotlok competition
स्पर्धेतील पहिले अर्धशतक तिरूपती सावर्डे संघाचा प्रथमेश पवार यांनी लगावले. स्पर्धेत शेवटच्या दिवशी मिकी माऊस खास आकर्षण ठरला. स्पर्धा नवलाई इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह दाखविण्यात आली त्यासाठी गणेश अप्पा बागकर यांनी आप्पाचा मित्र परिवाराकडून सौजन्य केले होते. Abdul Gani team winner in Kotlok competition
स्पर्धेत मुंबई,रायगड, कोल्हापूर येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पंच म्हणून राजू कनगुटकर, कैलास पिलणकर, अनिकेत आरेकर, ओंकार बागकर, अनुराग मोहिते,अमोल बेलवलकर यांनी केले. स्पर्धेचे समालोचन नितीन आळवे मिरा भाईंदर, सुभाष सावंत सर,बाळू बागकर, आसीम साल्हे, मंगेश मते, समीर ओक यांनी केले. प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी एस.पी.स्पोर्ट्स प्रथमेश सकपाळ यांच्याकडून टि शर्ट देण्यात आले. Abdul Gani team winner in Kotlok competition
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभावेळी भाजपा (BJP) गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, (Taluka President Nilesh Surve) भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष दिनेश बागकर, (BJP OBC cell president Dinesh Bagkar) डॉ.पराग पावरी, भाई बागकर, उदमेवाडी अध्यक्ष अनंत चव्हाण, प्रथमेश सकपाळ, नंदकुमार नार्वेकर, आबा आरेकर, सुनिल भेकरे, सतीश ठाकूर, आनंद शिगवण, शंकर मोहिते, नरेश बागकर,मुबारक इलेव्हनचे मालक मुबारक साल्हे, जामसुत ग्रामपंचायत सदस्य प्रकाश साळवी, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उपाध्यक्ष सचिन ओक, मंदार गुहागरकर, गणेश बागकर, समीर आरेकर,वैभव बागकर आदींसह राजा हिंदुस्थानी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, खेळाडू,क्रिडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. Abdul Gani team winner in Kotlok competition