अनंत गीते, आबलोलीतील प्रचारसभेत आबांची फटकेबाजी
गुहागर : Abaloli Pracharsabha of Anant Geete माझ्या उमेदवारीबाबत शरद पवार साहेबांनी शिक्का मोर्तब केला. रायगड लोकसभेची उमेदवारी अनंत गीतेंना द्या….तेच योग्य उमेदवार आहेत असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. मी माझा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझ्या प्रचाराला गुहागर मधूनच सुरुवात करत आहे. हि माझी विजयाची सुरुवात आहे. आता तर माझ्याबरोबर भास्कर जाधव आहेत. त्यामुळे मी गुहागरमधून मोठे मताधिक्य घेवून विजयी होईन, असे विधान गुहागरमधील आबलोली येथे झालेल्या सभेमध्ये अनंत गीते यांनी केले. Abaloli Pracharsabha of Anant Geete
Abaloli Pracharsabha of Anant Geete
मला उपस्थितीची चिंता नाही. तुम्ही मला सहा वेळा निवडून दिले आहे. यावेळी माझ्याबरोबर मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवही आहेत. त्यामुळे मी गुहागरमधून मोठे मताधिक्य घेऊन जाईन. आपण येथील सुखी जीवन सोडून धक्काबुक्कीच्या ठिकाणी मुंबईत जाता. शहर कितीही सुंदर वाटले तरी तेथे सुख नाही. पण नाईलाजाने आपल्याला तिथे जावे लागते. मुस्लीम बांधवांच्या घरातील एकतरी व्यक्ती आखाती देशात आहे. कारण येथील उत्पन्नावर आपले घर चालू शकत नाही. येथे रोजगार नाही. मी एक रोजगार आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो सार्थकी ठरला नाही. तुम्ही मला फक्त साथ द्या. रोजगार देणारा उद्योग मी येथे आणेनच! लोकशाही संकटात आली तर तुम्हाला आम्हाला विचारणार कोण? त्यामुळे हुकुमशाहीच्या विरोधात मतदान करा, असे अनंत गीते म्हणाले. Abaloli Pracharsabha of Anant Geete
या सभेला शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख सचिन कदम, तालुका प्रमुख सचिन बाईत, महेश नाटेकर, पद्माकर आरेकर, आबा बाईत, पूर्वी निमुणकर, नारायण गुरव, रविंद्र आंबेकर, सचिन जाधव, प्रदीप सुर्वे, शरद साळवी, काशिनाथ मोहिते, विजय वैद्य, तुषार सुर्वे, कृष्णा उकारडे, वनिता डिंगणकर, वृषाली वैद्य, पूजा कारेकर, नजीरभाई जांभारकर, हयात खले, बशीर चिपळूणकर, मुश्ताक भाई, इसाकभाई यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. Abaloli Pracharsabha of Anant Geete
आबांची राजकीय फटकेबाजी
पाच वर्षांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडर ५०० रुपये होता आता ११०० रुपये झाला. काँग्रेसच्या काळात सुद्धा पेट्रोल ६५ रुपये होते. मात्र आता भाजपाच्या काळात आज १०५ रुपये पेट्रोलचा दर आहे. गरिबांचे धान्य महाग झाले. बेरोजगारी वाढली अनेक उद्योजक आपल्या महाराष्ट्रात यायला तयार आहेत. येतातही मात्र मोदीजींना आपण मोठे केले आहे. त्यामुळे “हम करे सो कायदा” चांगला उद्योग आला की जाऊ दे “गुजरातला” ही परिस्थिती मोदींनी करून ठेवली आहे. जीएसटी च्या प्रकार सुद्धा असाच ५% टक्के जीएसटी असेल तेथे १२ % करायचे आणि १२% असेल येथे १८% करायचे हे धंदे यांचे चालले आहेत एका सिमेंट पिशवीला २८% जीएसटी आकारली जाते. हेलिकॉप्टरने फिरताहेत, चॉपरने फिरताहेत. “चार आण्याचे काम आणि बारआणे” खर्च यांचा चालला आहे. हे तुम्हाला आम्हाला लक्षात येत नाही. “मोदीजी की गॅरंटी फसवी” आहे त्यांच्या गॅरंटीला आता फसायचे नाही. संविधान बदलण्याची भाषा करतात. “अबकी बार चारसो पार” तो कोण म्हणतो ४०४ पार असे सर्व तुम्ही बादच होणार आहात व जनतेच्या लक्षात आले आहे. तुमची खोटी गॅरंटी सविधान बदलण्यासाठी यांना मेजॉरिटीची गरज आहे. ते होवू देऊ नका. “अलीबाबा आणि चाळीस चोर” आता ८० चोर झाले आहेत. अजित दादांचे ४० आणि शिंदेंचे ४० असे ८० चोर झाले आहेत. हे सर्व बादच होणार आहेत. असे आबलोली येथील उद्योजक चंद्रकांत उर्फ आबा बाईत यांनी या सभेत संबोधले. या सभेमध्ये आबांनी भाजपवर षटकारच ओढले. Abaloli Pracharsabha of Anant Geete