गुहागर, ता. 16 : येथील दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सवातील पहिल्या माळेला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील या आंब्याची चर्चा सर्वत्र होत आहे. देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी स्वखर्चाने 25 किलो आंबे खास नवरात्रात देवीची आरास करण्यासाठी आणले आहेत. Aaras of mangoes on the first day at Durga Devi
याबाबत बोलताना किरण खरे म्हणाले की, दुर्गादेवीच्या आरतीमध्ये सातव्या कडव्यात आम्ही भक्त तुझी नानाविध रसाळ फळांची, खाद्यपदार्थांनी पुजा करतो अशा अर्थाचे वाक्य आहे. गेल्यावर्षी ही आरती म्हणतात कोकणातील विविध फळे, भाज्या यांनी देवीची आरास आपण करु शकतो हे लक्षात आले. पुढच्यावर्षी नऊ दिवस कोकणातील फळांनी देवीची आरास करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे यावर्षी आंबे, नारळ, सुपारी, केळी, कोकणात पिकणाऱ्या अन्य भाज्या यांची आरास करण्याचा नियोजन आम्ही केले. कोकणचा राजा हापुस ऑक्टोबर महिन्यात मिळत नाही. मात्र प्रयोग म्हणून पिकलेले हापुसचे आंबे मे महिन्यातच डिफ्रिजरला ठेवले होते. Aaras of mangoes on the first day at Durga Devi
कर्नाटक राज्यात ऑक्टोबर महिन्यात निलम जातीचा आंबा बाजारात विक्रीला येतो. कर्नाटकातील देवीच्या भक्तांकडून उत्तम प्रतिचा निलम कुठे मिळतो याची माहिती घेतली. तेथील व्यापाऱ्यांशी बोलून 25 किलो आंबे विकत आणले. आमच्याकडे प्रयोग म्हणून ठेवलेले हापुसचे आंबे आणि कर्नाटकातील आंब्याची आरास देवीला केली आहे. मे महिन्यात डिफ्रिजरला ठेवलेला आंबा 4 महिन्यांनतर बाहेरच्या वातावरणात किती काळ टिकतो हे कळेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढच्यावर्षी केवळ हापुस आंब्याची आरास केली जाईल. Aaras of mangoes on the first day at Durga Devi