रत्नागिरी, ता. 21 : मंडपेश्वर सिव्हिक फेडेरेशन क्लब (बोरिवली) (Mandapeshwar Civic Federation Club) आयोजित सातव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने बाजी मारत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. सावंतवाडी, दादर व तिसरी मंडपेश्वर येथील ही स्पर्धा आकांक्षाने गाजवली. Aakansha kadam Winner in Carom Competition


सलग दोन वेळा जेतेपद पटकावत फॉर्मात असलेल्या रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या मिताली पाठक विरुद्ध पहिला सेट २२-१३ असा जिंकला. दुसऱ्या सेट केवळ दोन गुणांच्या फरकाने १७-१५ असा मितालीने जिंकून स्पर्धेतील चुरस कायम ठेवली. तिसऱ्या सेटमध्ये ७ बोर्डापर्यंत आकांक्षाकडे १२-१० अशी केवळ दोन गुणांची आघाडी होती. परंतु १६-१० अशा फरकाने आकांक्षाने मितालीला पराभूत करून विजयावर शिक्कमोर्तब केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत आकांक्षाने काजलकुमारीवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात २५-२४, १८-२१ आणि १२-११ असा निसटता विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. Aakansha kadam Winner in Carom Competition


महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या काजल कुमारीने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडवर २३-७, २५-६ अशी सहज मात केली. तर पुरुष गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या योगेश धोंगडेला तीन सेटमध्ये १०-१६, २३-११ व २३-१० असे पराभूत केले. असे हे सामने रंगतदार झाले. Aakansha kadam Winner in Carom Competition