• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या समुद्रात बूडून एका पर्यटकाचा मृत्यू

by Guhagar News
December 27, 2025
in Guhagar
502 5
3
A tourist drowned in the sea at Guhagar
986
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तिघांना वाचविण्यात ग्रामस्थ आणि जीवरक्षकांना यश

गुहागर, ता. 27 : शहरातील वरचापाट परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर भर दुपारी दोन कुटुंबातील 4 जण पाण्यात उतरले होते. त्यापैकी 42 वर्षीय अमुल मुथ्था यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. तर दोन मुले आणि एका महिलेला गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि श्री समर्थ वॉटर स्पोटर्सच्या दोन कर्मचाऱ्यांनी वाचविले. ही घटना 27 डिसेंबरला दुपारी 11.45 ते 12.15 च्या दरम्यान घडली. A tourist drowned in the sea at Guhagar

A tourist drowned in the sea at Guhagar

सध्या नाताळच्या सुट्ट्या असल्याने गुहागरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी आहे. यापैकी अनेक पर्यटकांसाठी गुहागरचा समुद्र हा आकर्षणाचा मुख्य बिंदु असतो. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई चांदेराई येथे रहाणारे कांचन विजयकुमार मुथ्था, अमुल विजयकुमार मुथ्था, सौ. श्वेता अमुल मुथ्था आणि विहान अमुल मुथ्था हे कुटुंब 24 डिसेंबरला सायंकाळी गुहागरमध्ये दाखल झाले. अमुल मुथ्था व श्वेता मुथ्था सॉफ्टवेअर इंजिनिअर असून दोघेही मुंबईत नोकरी करतात. नाताळची आठ दिवसांची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी त्यांनी गुहागरजवळ जोशी होम स्टेमध्ये मुक्काम केला होता. सौ. श्वेता मुथ्था यांची पिंपळे सौदागर, पुणे येथे रहाणारी बहिण सौ. सोनल सिंघवी ही पती पंकज सिंघवी आणि मुलगी सिया सिंघवी यांच्यासह 26 डिसेंबरला गुहागरला आली. सिंघवी कुटुंब शहरातील राजगड हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. 26 डिसेंबरला रात्री सिंघवी व मुथ्था कुटुंब एकत्र आले त्यावेळी त्यांनी 27 डिसेंबरला दुपारी समुद्रावर पोहायला जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मुथ्था कुटुंब आणि सिंघवी कुटुंब 27 डिसेंबरला दुपारी 11.45 च्या दरम्यान हॉटेल राजगडच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. पंकज सिंघवी आणि सोनल सिंघवी समुद्रकिनाऱ्यावर वाळुत थांबले होते. तर अमुल मुथ्था (वय 42), श्वेता मुथ्था (वय 42), विहान मुथ्था (वय 13) आणि सिया सिंघवी (वय 19) हे चौघे समुद्रात पोहायला गेले. पाण्यात खेळता खेळता अमुल मुथ्था खोल पाण्यात गेले. त्यांनी पुन्हा किनारा गाठण्यासाठी पोहायला सुरवात केली. मात्र त्यांची दमछाक झाली. अन्य तिघे देखील अमुल मुथ्था यांच्यापासून थोड्या अंतरावर होते. सिया सिंघवीने मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरवात केली. A tourist drowned in the sea at Guhagar

A tourist drowned in the sea at Guhagar

याच काळात पवारसाखरी येथील अक्षय पवार सहज फिरायला समुद्रावर आले होते. त्यांनी पर्यटकांची ओरड ऐकली आणि सोहम सातार्डेकरला फोन करुन मदतीसाठी बोलावले. सोहमने नगरपंचायतीचा कर्मचारी आशिष सांगळे याला फोन केला. आशिष आणि सोहम समुद्रावर येत असतानाच त्यांनी जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोटर्सचे मालक उमेश भोसले यांना फोन केला. याच काळात पोलीसांपर्यंतही बातमी पोचली. प्रदेश तांडेल आणि श्री समर्थ वॉटर स्पोर्टस्‌मधील कर्मचारी मुजाहुद्दीन मिरकर व सद्दाम बागकर असे तिघेजण जेट स्की घेवून समुद्रातून हॉटेल राजगडच्या मागे समुद्रातून आले. त्यांनी बेशुध्दावस्थेत असलेल्या अमुल मुथ्था यांच्यासह श्वेता मुथ्था, विहान मुथ्था आणि सिया मुथ्था यांना समुद्रकिनाऱ्यावर आणले. जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि आशिष सांगळे यांनी अमुल मुथ्थांना सीआरपीची ट्रीटमेंट दिली. तोपर्यत गुहागरचे पोलीसही तेथे पोचले होते. बेशुध्द अवस्थेतील अमुल मुथ्था यांना तत्काल वाहनाने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अमुल मुथ्था यांना मृत घोषित केले. A tourist drowned in the sea at Guhagar

Tags: A tourist drowned in the sea at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share394SendTweet247
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.