• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बुरखा घालुन आला प्रेयसीला भेटायला

by Ganesh Dhanawade
September 7, 2022
in Guhagar
18 0
0
A missed love story

A missed love story

36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळीतील घटना, पोलीसांच्या रगाड्यांनंतर सत्य बोलला

गुहागर, ता. 06 : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी (A missed love story) खेर्डी चिपळूणमधील 24 वर्षीय तरुण बुरखा घालून शृंगारतळीत आला. एका व्यक्तीने मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर विनोद जानवळकर यांनी बुरखाधारी तरुणाचा पाठलाग केला. पोलीसांच्या साह्याने शृंगारतळी बाजारपेठेत पकडले. तेव्हा या तरुणाचे बिंग फुटले. पोलीसांनी गुहागर पोलीस ठाण्यात रगाडे दिल्यावर तरुणाने सत्य सांगितले. मात्र तरुणाने तोंड उघडल्याने आणखी काही जणांनी नावे समोर येतील यामुळे अनेकांची वाचा बसली होती.

विनय विजय गुरसाळे (वय 24, मुळगांव आबलोली, सध्या रहाणार खेर्डी ता. चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. याचा खेर्डीमध्ये सौंदर्य प्रसाधने विकण्याचा व्यवसाय आहे. तसेच विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारांमध्येही विनयचे दुकान असते. व्यवसायाच्या निमित्ताने विनय कायम शृंगारतळीमध्ये येत असे. तेव्हा येथील एका विवाहीतेबरोबर विनयचे सुत जमले होते.  या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी विनय मंगळवारी (दि. 6 सप्टेंबरला)  दुपारी 3.30 च्या दरम्यान चक्क बुरखा घालुन ॲक्टिव्हावरुन शृंगारतळीला आला. शृंगारतळीतील एका पार्लरच्या परिसरात विनय थांबला होता. महिलां वापरतात तशा सॅण्डल असल्याने तो अडखळत होत्या. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तेथील एका अज्ञात व्यक्तीने मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांना फोन केला.  मनसेचे जिल्हाध्यक्ष जीतेंद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमात असल्याने विनोद जानवळकर यांनी प्रथम फोन घेतले नाहीत. मात्र सदर व्यक्तीने अन्य फोन करुन निरोप देवून या घटनेची गंभीरता सांगितली. त्यानंतर विनोद जानवळकर आपल्या काही कार्यकर्त्यासह घटनास्थळी आले. आपला कोणाला तरी संशय आला आहे हे लक्षात आल्यावर बुरखाधारी विनय ॲक्टिव्हा घेवून मळणच्या दिशेने पळाला. तेथून विनय शृंगारतळी गुहागर रस्त्यावरील बर्फ कारखान्याकडे गेला. विनयच्या गाडीचा वेग लक्षात घेतल्यावर ही महिला नाही हे विनोद जानवळकर यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी शृंगारतळीत गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना ही माहिती दिली. आणि सदर ॲक्टिव्हा अडकविण्यास सांगितले. विनोद जानवळकर बर्फ कारखान्याशी आल्यावर विनय ॲक्टिव्हा घेवून पुन्हा बाजारपेठेत आला. तिथे असलेल्या पोलीसांनी बुरखाधारी विनयला पकडले. A missed love story

बुरखाधारीला पकडल्यावर शृंगारतळी पोलीस चौकीसमोर जमलेला जमाव
बुरखाधारीला पकडल्यावर शृंगारतळी पोलीस चौकीसमोर जमलेला जमाव

सुरवातीला विनय पोलीसांना उलटसुलट माहिती देत होता. त्यामुळे शृंगारतळीतील पोलीसांनी विनयला गुहागर पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलीसांनी आपला हिसका दाखविल्यावर विनयने आपली प्रेम कहाणी पोलीसांना सांगितली. विनयने तोंड उघडल्यामुळे हे प्रकरण वाढले तर आपण अडचणीत येवू. आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोचले. अशी भिती काही जणांना वाटु लागली. त्यामुळे सदर घटना पसरु नये यासाठी काही जण दक्षता घेत होते.A missed love story

दरम्यान विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी त्याने बुरख्याचा आधार घेतला. ही गोष्ट शृंगारतळीत समजल्यावर काही मंडळींनी संताप व्यक्त केला. असे प्रकार पुन्हा घडून दोन समाजात कोणतीही तेढ निर्माण होऊ नये. यासाठी सदर दोषीवर कारवाई करावी. अशी मागणी या समाजातील मंडळींनी पोलीसांकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणात गुहागर पोलीसांनी विनय गुरसाळेवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. विनयसह त्याच्या विवाहित प्रेयसीचा जबाब पोलीसांनी नोंदवरुन घेतला आहे.A missed love story

Tags: A missed love storyGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.